पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणारा इम्तियाज मागरे आर्मीच्या तावडीतून सुटला Video

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 पर्यटकांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना(terrorists) मदत करणाऱ्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तंगमार्ग येथील अदबल नाल्यात 23 वर्षीय इम्तियाज अहमद मागरेचं शव सापडलं आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय सेनेने मागरेला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार इम्तियाज मागरे हा दहशतवाद्यांचा ऑन ग्राऊंड वर्कर होता.

सेनेच्या चौकशीत मागरेने दहशतवाद्यांच्या(terrorists) एका ठिकाण्याची माहिती दिली होती. तसंच सेना त्याला घेऊन दुसऱ्या ठिकाणाकडे निघाली होती. यावेळी इम्तियाजने सेनेच्या तावडीतून पळ काढत, सुटकेसाठी थेट पाण्यात उडी घेतली. मात्र तो पळून जाण्यात अपयशी ठरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. सेनेने पळून जाणाऱ्या मागरेचं ड्रोन फुटेज समोर आलं आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती सुरक्षा दलापासून वाचवण्यासाठी पळताना दिसतो आहे. त्यावेळी तो त्या वाहत्या पाण्यात उडी मारतो आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातो. या व्यक्तीवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप होता. त्यासाठीच त्याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. मात्र तो गुंगारा देत पळाला. त्यानंतर पोलिसांनी सकाळी कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू केलं.

तो ड्रोन व्हिडिओग्राफीद्वारे कडक देखरेखीखाली असताना वाहत्या पाण्याजवळ लपण्यासाठी गेला. यानंतर त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली. त्याने पाणी कमी असेल असं समजून नदीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असाना. त्यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काल (रविवारी) सकाळच्या सुमारास एका त्याचा मृतदेह आढळला. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा शोध घेत असताना तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आणि त्याचवेळी त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच नावं इम्तियाज अहमद मगरे असं आहे, तो 23 वर्षांचा होता. तरुणाला सुरक्षा दलाकडून ताब्यात घेण्यात आलं होतं.

इम्तियाज कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्ग येथील राहणारा होता. तो मजूरी काम करायचा. शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांबाबत माहिती दिली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने पोलिसांना सांगितलं, की त्याने कुलगाममध्ये तंगमार्ग येथील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना जेवणं आणि निवारा दिला होता.

हेही वाचा :

मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर; ९१.८८ टक्के उत्तीर्ण

पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतला तांत्रिकांचा आधार पंजे अन् दात कापले…

अडानीच्या ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी, चौथ्या तिमाहीत दिसणार धमाकेदार ‘नफा’