पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतला तांत्रिकांचा आधार पंजे अन् दात कापले…

मध्यप्रदेश मध्ये असे काही घडले जे ऐकून पोलीस सुद्धा थक्क झाले. आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवरोब्यांनी तंत्रिकांचा(crime) आधार घेतला. तांत्रिकांच्या सूचनेनुसार जंगलात गेले परंतु ते जंगलातून थेट तुरुंगात गेले. असं काय केलं त्या दोघांनी? जे ते थेट तुरुंगात पोहोचले. नेमकं काय प्रकरण?

प्रत्येक नवऱ्याला आपली बायको आपल्या कंट्रोलमध्ये असावी असं वाटतं. नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवऱ्यांनी असं काही केलं जे थेट ते तुरुंगात गेले. मध्यप्रदेशातील सिवनी येथील दोन नवऱ्यांनी आपल्या पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी तांत्रिकांचा आधार घेतला. ते दोघेही जंगलात गेले आणि तेथून थेट ते तुरुंगात गेले.

तांत्रिकाच्या सूचनेनुसार त्यांनी वाघिणीची पंजे आणि दात कापले, तसेच तिचे चामडे काढण्याचा प्रयत्न केला. पण, हे कृत्य उघडकीस आले. दोघांना पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगवास झाला. या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि विचित्र आहे.

सिवनी जिल्ह्यात पेंच टायगर रिझर्व्ह एरियात 26 एप्रिल 2025 रोजी एक वाघिणीचा मृतदेह सापडला. तपासानंतर या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला नसून तिचे पंजे कापल्याने झाल्याचं आढळून आलं(crime). वाघिणीचे टोकदार दात काढलेले होते आणि तिची चमडीही काढण्यात आलेली होती. त्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आरोपींना अटक केली. या आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे.

या प्रकरणात एकाला अटक केल्यानंतर त्यात आणखी पाचजण असल्याचं उघड झालं. राज कुमार, झाम सिंह, छबी लाल, रत्नेश पार्टे आणि मनीष उइके असं या पाच लोकांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर अधिक चौकशी केली असता राज आणि झाम या दोन आरोपींनी जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलीस आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

दोन्ही आरोपींनी बायकोला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे कृत्य केल्याचं सांगितलं. त्यांना एका तांत्रिकाने वाघाचे पंजे आणि दात आणण्यास सांगितलं होतं. त्यावर तंत्रमंत्र केल्याने ताकद मिळते. त्यामुळे बायको वशमद्ये येऊ शकते. जेव्हा ते वाघिणीचे दात आणि पंजे घेऊन आले तेव्हा तांत्रिकाने वाघिणीचे चामडे (खाल) मागितली. त्यासाठी पुन्हा हे दोघे जंगलात गेले. त्यावेळी त्यांना कुणी तरी पाहिलं आणि पकडल्या गेले. या गुन्ह्यात आणखी तीन लोकांचं समावेश असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या पाचही जणांना अटक केलं असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा :

छोटा दत्तू मोरे आला होsss ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही….?

‘या’ तारखेला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही; राज्यव्यापी बंदची हाक