महाराष्ट्राची हास्यजत्रा या मनोरंजन कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला सर्वांचा लाडका अभिनेता दत्तू मोरे याने त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी(good news) दिली आहे. दत्तू मोरेच्या घरी छोट्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. दत्तूने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे. छोट्या दत्तू मोरेचं आम्ही स्वागत करत आहोत, असं कॅप्शन देत दत्तूने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दत्तूने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लग्नाच्या दोन वर्षांनंतर दत्तू मोरे बाबा झाला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि संपूर्ण जनतेला खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या घरी आता आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. दत्तूने त्याच्या सोशल मीडियावर बाबा झाल्याची गोड बातमी(good news) चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, शेवटी… तो आलाच! आता आम्हाला ब्लेम करण्यासाठी आमच्या हक्काचा एक लहानसा पाहूणा आला आहे. या छोट्याशा आशीर्वादांसाठी आम्ही सदैव आभारी आहोत. आम्ही “छोटा दत्तू मोरे” चे स्वागत करतो.
दत्तूने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, मोरे परिवाराचे मनपूर्वक अभिनंदन. तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, खूप खूप अभिनंदन आई बाबांचे आणि बाळाला खूप सारं प्रेम…
सोशल मीडियावर दत्तूने त्याची पत्नी स्वाती घुनागे ( मोरे ) हिच्यासोबत फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर त्याने त्याच पोस्टमध्ये बाळाचा हात हातात घेऊन देखील फोटो शेअर केले आहेत. दत्तूने शेअर केलेली ही पोस्ट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक सूखद धक्काच आहे.
23 मे 2023 रोजी दत्तूने स्वाती घुनागे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. स्वाती घुनागे ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ आहे. त्यांचं लग्न साध्या पद्धतीत पार पडलं होतं. दत्तू त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसोबतच अनेक फोटो शेअर करत असतो. दत्तू आणि स्वातीची जोडी चाहत्यांना अगदी मनापासून आवडते.
हेही वाचा :
माथेफिरू प्रियकराने गर्लफ्रेंड आणि बहिणीला थेट…
BCCI पाकिस्तानला आशिया कपमधून करणार बाहेर, दिग्गज क्रिकेटरने केला दावा
इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार; दुपारी १ वाजता निकाल, ‘या’ संकेस्थळावर पाहा