अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच व्लॉगमध्ये केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. शस्त्रक्रिया आणि आयसीयूचा उल्लेख करत त्यांनी ही पोस्ट केली आहे. नेमकं काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच केलेल्या ब्लॉग पोस्टमुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आपल्या वैयक्तिक ब्लॉगमध्ये त्यांनी रुग्णालयात शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग (ICU) आणि (Amitabh Bachchan) त्यानंतरच्या शारीरिक व मानसिक संघर्षाचा उल्लेख केला आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
83 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भावनिक शब्दांत लिहिले की, ‘रुग्णालयातील शस्त्रक्रिया, आयसीयूमधील उपचार आणि डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची काळजी… त्यानंतर रुग्णालयातून घरी परतणे हा सर्वात कठीण काळ असतो. शारीरिक, मानसिक आणि व्यवहारिकदृष्ट्या हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक असतो. एक दिवस आपण विजेता असतो, पण दुसऱ्याच दिवशी पराभव आपल्या समोर उभा ठाकतो. हा आयुष्यातील सर्वात कठीण क्षण असतो’ असं त्यांनी म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी संकटांचा सामना करण्याबाबतही विचार व्यक्त केला. त्यांनी लिहिले, ‘काही जण या परिस्थितीचा धैर्याने सामना करतात, (Amitabh Bachchan) तर काही जण हार मानतात. जे प्रयत्न करत राहतात आणि धैर्य दाखवतात, तेच खरे विजेते ठरतात. तर काही जण भूतकाळातील यशाच्या आठवणींवर समाधान मानतात. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही. आनंदी राहा, निरोगी राहा.’ सोशल मीडियावर गूढ पोस्ट ब्लॉग पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही एक गूढ संदेश शेअर केला. त्यांनी लिहिले, ‘T 5806 – खेळ संपला आहे! पण काम अजूनही सुरू आहे.’
या संदेशामुळे चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता आणि चिंता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांनी नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली किंवा ती अलीकडील आहे की पूर्वीच्या अनुभवाबद्दल त्यांनी लिहिले आहे, (Amitabh Bachchan) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. खेल खत्म हो गया’, अमिताभ बच्चन ने कर दी ऐसी पोस्ट, फैंस को बिग बी की तबीयत को लेकर हुई चिंता चाहत्यांकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉग आणि सोशल मीडिया पोस्टनंतर चाहते त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, त्यांच्या आरोग्याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?