आज इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची(students) काही क्षणात प्रतीक्षा संपणार आहे. पुढच्या काही तासांत इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तशी अधिकृतपणे माहिती दिली आहे. दरम्यान, हा निकाल कुठं पाहावा? हे जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवारी म्हणजेच 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. याच परीक्षेचा निकाल तुम्हाला खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे(students) विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसंच, https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर निकाल
1) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
2) https://results.digilocker.gov.in
3) https://mahahsscboard.in
4) http://hscresult.mkcl.org
हेही वाचा :
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांवर भारतात बंदी
शरद पवार भाकरी फिरवणार, रोहित पवारांचा ‘तो’ आग्रह अखेर पूर्ण होणार?
BCCI पाकिस्तानला आशिया कपमधून करणार बाहेर, दिग्गज क्रिकेटरने केला दावा