शरद पवार भाकरी फिरवणार, रोहित पवारांचा ‘तो’ आग्रह अखेर पूर्ण होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस SP मध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार(todays political news) लवकरच पक्षात मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी SP पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील भुसारा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

विद्यमान राष्ट्रवादी SP पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील भुसारा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(todays political news) यांना विश्वासात घेऊनच फेरबदल होत असल्याची माहिती मिळालेली आहे. तसंच, आमदार रोहित पवार यांच्याकडेही महत्त्वाचे पद दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवक प्रदेशाध्यक्षपदासाठी रोहित पाटील यांना सनदी दिली जाऊ शकते अशी माहिती आहे. रोहित पवार यांच्याकडे संघटनात्मक सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मुंबईतील आठवडाभराच्या बैठकांनंतर संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादीही निश्चित झाली असून शरद पवारांच्या होकारानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार प्रभारीपदे वाटून दिली जाणार आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे या मुंबईत होत्या. तेव्हा या सर्व गुप्त बैठका झाल्या होत्या. पक्षातील कोअर टीम या बैठकीला उपस्थित होती. तेव्हा या सगळ्या चर्चा झाल्या. गेल्या दोन महिन्यांपासून जयंत पाटील सातत्याने बोलताना दिसत होते की मला थोडा बदल हवाय. गेल्या आठ वर्षांपासून मी ही जबाबदारी सांभाळतोय, त्यामुळंदेखील हे बदल करण्यात येत आहेत का? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.

तसंच, विधानसभेच्या आधी रोहित पवार गट अॅक्टिव्ह झाला होता. रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद हवं होतं. पण तेव्हा जयंत पाटलांनी जाहिरपणे सुनावलं होतं. माझे दिवस मोजू नका मी पद देणार आहे. पण शेवटी निवडणुका झाल्यानंतर आठ महिन्यानंतर भाकरी फिरवणे गरजेचे होते. नव्या नेतृत्वाला पुढे आणणे गरजे होते. त्यातूनच ही सगळी चर्चा सुरू झाली होती. अशी चर्चा आहे.

शरद पवार याच्यावर काय निर्णय घेतात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ही नावं एकमताने शिक्कामोर्तब झाली आहेत. रोहित पवार या बदलासाठी आग्रही असल्याचेही बोललं जातं आहे. 10 तारखेला पक्षाचा वर्धापन दिन आहे तोपर्यंत बदल करावेत असा आग्रहदेखील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यादी तयार असून शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच हे बदल होणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; तब्बल ‘इतके’ अर्ज झाले बाद, कारण काय तर…

‘माझ्या खात्याचे पैसे ‘लाडकी बहीण’साठी वळवले, सहन करण्याची मर्यादा’- संजय शिरसाट संतापले

शिल्पामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त प्रसिद्ध उद्योजकाच्या पहिल्या बायकोची खंत