लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; तब्बल ‘इतके’ अर्ज झाले बाद, कारण काय तर…

संभाजीनगर : राज्य शासनाने महिलांसाठी आर्थिक स्त्रोत तयार करण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा(yojana) लाभ आधी सरसकट देण्यात आला. मात्र, निवडणुकीनंतर लाभार्थ्यांच्या यादीला कात्री लावण्यात आली. त्यात करण्यात आलेल्या छाननीतून घरी माळी आणि दारात गाडी असलेल्या 50 महिलांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला.

गोंदिया जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे(yojana) एकूण 3 लाख 64 हजार 245 लाभार्थी होते. मात्र, सुरुवातीला या तालुकानिहाय पात्र व अपात्र लाभार्थी योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता.

ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाला दिले आहे. त्यात चारचाकी असणारे लाभार्थी, नोकरीवर असलेल्या, आयकर भरणाऱ्या आणि लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाभाथ्यर्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तर काही लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको, म्हणून या विभागाकडे अर्ज करत आहे.

तर काही अर्जामध्ये पडताळणींमध्ये त्रुट्या आढळल्या. त्यामुळे असे एकूण 26 हजार 927 अर्ज आतापर्यंत रद्द करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 3 लाख 64 हजार 245 महिलांनी अर्ज केले होते. आता शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारावर या सर्व अर्जाची पडताळणी करण्याचे काम महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यात बरेच अर्ज निकषात न बसणारे असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. त्यात 50 लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तर काही अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांपैकी नोकरीवर असलेल्या व अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या 20 लाडक्या बहिणींनी आतापर्यंत योजनेचा लाभ सोडण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केले आहे.

हेही वाचा :

सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी! हा संघ होणार चॅम्पियन, इतिहास रचला जाणार

‘माझ्या खात्याचे पैसे ‘लाडकी बहीण’साठी वळवले, सहन करण्याची मर्यादा’- संजय शिरसाट संतापले

शिल्पामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त प्रसिद्ध उद्योजकाच्या पहिल्या बायकोची खंत