रत्नागिरीत डोंगर खचला; थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

कोकणातील मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात(video) नुकसान होत आहे. दापोली तालुक्यातील साखलोळी येथे डोंगर खचल्याची घटना समोर आली आहे. डोंगर खचताना व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रत्नागिरीमधील पूरस्थिती: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड आणि रस्ता खचण्याच्या घटना(video) घडत आहेत. खेडच्या शिवतर गावातील नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प झाली असून ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

गुहागर तालुक्यात डोंगर खचला: गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावालगतचा डोंगर खचल्याने या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या भूस्खलनामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी टाकीही खचली आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीचं पाणी ओसरलं: वाशिष्टी नदीचं पाणी चिपळूण बाजारपेठेत शिरलं होतं, मात्र आता पूर ओसरला आहे. पुरामुळे बाजारपेठेत चिखल झाला असून सफाईचं काम सुरु आहे.

साताऱ्यातील कराड-चिपळूण रस्त्यावर पूर: साताऱ्यातील कोयना आणि पाटण भागात जोरदार पावसामुळे कराड-चिपळूण रस्त्यावरील काही दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. पाटण बस स्थानकातदेखील पाणी साचल्याने वाहनधारकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून 24 तासात धरणातील पाणी 4 टीएमसीने वाढले आहे.

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरला येलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, आणि पालघर भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांत मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध भागातील पावसामुळे निर्माण झालेली ही पूरस्थिती नागरिकांसाठी मोठी आव्हानात्मक आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती करण्यात येत आहे.

हेही वाचा :

एका रसगुल्लाने घातला लग्नात गोंधळ, रंग बिघडला, मारामारी आणि दगडांचा पाऊस

विशाळगडावर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात; जिल्हाधिकारी, एसपींसह प्रमुख अधिकारी गडावर

‘बॉडी की तौबा तौबा’, पाकिस्तानला हरवल्यानंतर युवराज, हरभजन आणि रैनाची झाली अशी परिस्थिती