उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ २०२५ मध्ये आतापर्यंत (Mahakumbh)कोटींच्या घरात लोकांनी स्नान केलं असेल. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ९३ लाखांहून अधिक भाविकांनी संगमात धार्मिक स्नान केले आहे. पुरुष आणि महिलावर्ग मोठ्या संख्येनं येतात आणि स्नान करतात.पण महिलांनो नदीत अंघोळ करण्यापूर्वी सावध व्हा. कारण, काही कॅमेऱ्यांचा तुमच्यावर डोळा आहे. काही लोक तुमचे स्नान करतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मिडियामध्ये शेअर करत आहेत. ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

संगमात पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुली आणि महिला जातात. मात्र, काही लोक महाकुंभात स्नान करण्यासाठी आलेल्या महिलांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. याशिवाय, काही महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडिया विकत आहेत. नदीत अंघोळ करण्यापासून ते बदलण्यापर्यंतचे फोटो टेलिग्रामवर विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.काही (Mahakumbh)जण हे फोटो आणि व्हिडिओ जुने असल्याचा दावा करत आहेत. तर काहींनी हे फोटो आणि व्हिडिओ प्रयागराजमधील नसल्याचा दावा केला आहे. पण हे फोटो महाकुंभातील असल्याचं सांगून व्हायरल करण्यात येत आहे.
याप्रकरणी प्रयागराज महाकुंभ मेळ्याचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, ‘सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ तसेच टेलिग्राम ग्रुपचा शोध सुरू आहे.(Mahakumbh) त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात येत आहे. तसेच कारवाई केली जाईल’.
तर माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, महाकुंभात महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.
हेही वाचा :
भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या
देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान घडला धक्कादायक प्रकार!