इराणच्या सर्वोच्च नेता मरणाच्या दारात केला जात आहे. इराणी मीडियाने केलेल्या दाव्यामुळे संपूर्ण जगात खळबल उडाली आहे.

इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांचा 28 फेब्रुवारी 2026 साली झालेल्या संघर्षात मृत्यू झाला होता. (Iranian) त्यानंतर इराणच्या सर्वोच्च पदावर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांना गादीवर बसवलं होतं. खामेनेई यांना सर्व जगापासून दूर ठेवण्यात आलं आहे. परंतु इस्त्रायलच्या माध्यमांनी धक्कादायक दावा केला आहे. मोजतबा खामेनी यांची तब्येत बिघडली असून तब्येत पूर्णपणे बिघडली आहे. खामेनी हे मरणाच्या दारात असल्याचा दावा इस्त्रायली माध्यमांनी केला आहे.
इस्त्रायली माध्यमांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे. (Iranian) त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यांचा आता कधीही मृत्यू होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या माध्यमांच्या दाव्यानुसार, रुग्णालयात इराणच्या खामेनी प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या रिपोर्टमध्ये त्यांनी इराणमधील स्वतंत्र्य मीडिया प्लॅटफॉर्म ‘इराणवायर’चा संदर्भ दिला आहे. यात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्या प्रशासनाशी संदर्भात अनेक बडे दावे करण्यात आले आहेत.
इराणवायरच्या रिपोर्टनुसार, पेजेशकियान प्रशासनाच्या दोन बड्या सूत्रांनी खुलासा केला आहे की, 28 फेब्रुवारी रोजी सुप्रीम लीडरच्या परिसरात अमेरिकेने हल्ला केल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी अद्याप मंत्रिमंडळाच्या कोणत्याही सदस्यांची भेट घेतलेली नाही. तर मोजतबा यांचे वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य हल्ल्यात मारले गेले आहेत. इराणचे सुप्रीम लीडर पद सांभाळल्यानंतर मोजतबा खामेनी एकदाही समोर आलेले नाहीत. (Iranian) त्यांना मागील काही काळापासून जगाच्या नजरेपासून दूर ठेवलं आहे. त्यांना भेटण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. मोजतबा हे वडील अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्ययात्रेतही सामील झाले नव्हते. दुसरीकडे इराणचं सरकारकडून मोजतबा खामेनी सुरक्षित असल्याचा वारंवार दावा केला जात आहे. त्यांना सुरक्षेच्या कारणात्सव बाहेर आणलं जात नसल्याचे कारण सरकारकडून दिलं जात आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?