गणेश चतुर्थीचा उत्साह आणि आनंद सुरू असतानाच बेळगावमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. (accident) चव्हाट गल्ली परिसरातील ढोरवाडा येथे मध्यरात्री एका घराला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार महिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरामध्ये सर्वजण झोपेत असताना अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (accident) काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते. या दुर्घटनेत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये शारदा गजानन धमुणे, प्रिया गजानन धमुणे, गंगा गजानन धमुणे आणि भारती राजाराम धमुणे यांचा समावेश आहे. या चौघींच्या मृत्यूने धमुणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गजानन धमुणे आणि रोशन गजानन धमुणे हे दोघे या आगीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरातील गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. (accident) काही तासांपूर्वी ज्या परिसरात सणाचा उत्साह होता, त्याच ठिकाणी आता शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे चव्हाट गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?