विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आज काँग्रेस पक्षाचा मेळावा सांगलीमध्ये(political news) पार पडत आहे. आजच्या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांंच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी नाकारण्यावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली.
“सांगलीची जागा ही काँगेसला(political news) मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट. मला ही सतत लोकसभा लढवण्यचे आवाहन करण्यात आले. मात्र मी विधानसभा लढवण्यावर ठाम राहिलो, असे विश्वजित कदम म्हणाले.
“सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले आणि आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसच खासदार असेल. पण जागा वाटप चर्चा सुरू झाल्यावर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला. शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढती असे ठरले होते. मगं ठाकरेंनी सांगलीवर कसा काय हक्क सांगितला?” असा सवाल विश्वजित कदम यांनी उपस्थित केला.
“उद्धव ठाकरे आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, हे असे चालते का? सांगलीची जागा देणे हे चुकीचेच होते. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते? सांगलीत आम्ही सर्व काँगेस नेते एकत्र आलो आणि त्याला दृष्ट लागली. पण ती दृष्ट काढता देखील येईल. पण शेवटी विजय हा आमचाच असेल, असे विश्वजित कदम म्हणाले.
“हे सगळे प्रयत्न करत असताना शेवटी काय झाले हे कार्यकर्ते विचारत होते. सापशिडीच्या खेळा प्रमाणे दुर्दैवाने आम्हाला साप चावला. ज्यांनी हे कटकारस्थान केले त्यांना सोडणार नाही. पतंगराव याचे गुण माझ्यात आहेत. विशाल यांना विनंती केली की भावा अपक्ष लढून नको, राज्यसभा भेटेल. पुढची लोकसभा लढवू, जिंकू, असेही सांगितले. आम्ही याचा वचपा काढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :
षटकार-चौकारांचा पाऊस पाडल्यानंतर ऋषभ पंतला मागावी लागली माफी!
सांगलीत विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक
PM मोदींसह आता राहुल गांधींनाही निवडणूक आयोगाची नोटीस, उत्तरे द्यावी लागणार!