कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या अकरा जागांसाठी 12 उमेदवार(candidate) उभे राहिल्याने शुक्रवारी निवडणूक झाली. मतदान झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अपेक्षेप्रमाणे मात्र निकाला लागले नाहीत. अजितदादा पवार गटाची मते फुटतील म्हणून त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना बारावा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते. पण त्यांचा दारूण पराभव झाला.
राष्ट्रीय काँग्रेसने आघाडी धर्म पाळला म्हणून ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर कसेबसे विजयी झाले. काँग्रेसची काही मते फुटली पण अनपेक्षित असे काही घडले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांचा अपेक्षा भंग झाला. पंकजा मुंडे ह्या विधान परिषदेवर गेल्याने भारतीय जनता पक्षाचे काही नेते आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीत(candidate) महायुतीला पराभवाची जबरदस्त. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची घरं वापसी होणार. दोन्ही गटांना विधानसभा निवडणुकीत फारसे यश मिळणार नाही त्यामुळे आमदार बाहेर पडणार अशा चर्चा गेल्या महिन्याभरापासून चालू झाल्या होत्या. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून दादा गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असे सांगितले जात होते. असेच काहीसे घडेल असे गृहीत धरून शरद पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात बारावा उमेदवार म्हणून आणले पण दादा गटाचा एकही आमदार फुटला नाही. परिणामी जयंत पाटील यांचा सणसणीत पराभव झाला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गटाने जयंत पाटील यांना रिंगणात आणले नसते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. करोडो रुपयांची उलाढाल त्यामुळे थांबली असती. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील आमदारांचे संख्याबळ माहित असूनही शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने निवडणुकीचा सारीपाट का मांडला? याचे उत्तर त्यांच्या त्यांच्या गृहीतकात मिळते.
महायुती मधील मते मोठ्या प्रमाणात फुटतील किंवा अजितदादा गटाचे किमान 15 ते 20 आमदार मदत करतील हे त्यांचे गृहीतक होते. पण तसे घडले नाही. या निवडणुकीत शरद पवारांनी एक सेफ गेम खेळला आणि तो म्हणजे त्यांनी स्वतःच्या गटाचा उमेदवार या निवडणुकीत उतरवला नाही. जयंत पाटील यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून अजितदादा गटात किती अस्वस्थता आहे हे समजेल हा सुद्धा त्यामागचा हेतू असावा. जयंत पाटील यांचा पराभव हा शरद पवारांचा पराभव असल्याचे मानले जाते किंवा मानले जाईल.
बारावा उमेदवार(candidate) रिंगणात आल्याने, महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या नेत्यांना सावध पाऊले उचलावी लागली. आमदारांची इकडे तिकडे पळापळ होऊ नये म्हणून सर्वांनीच आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्स मध्ये ठेवले होते. त्यावर करोडो रुपये खर्च झाले. काही प्रमाणात घोडेबाजारही झाला. पण निकाल अपेक्षित लागले. 11 पैकी नऊ जागा महायुतीने जिंकल्या. राष्ट्रीय काँग्रेस आणि ठाकरे गट यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. अकराव्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचे शेकापचे जयंत पाटील यांच्यातच लढत झाली. काँग्रेसने आघाडी धर्म पाळल्याने नार्वेकरांचा विजय झाला, पण तोही कसाबसा. काँग्रेसची काही मते इकडे तिकडे झाली. त्याचे आत्मचिंतन आता नाना पटोले तसेच विजय वडेट्टीवार यांनी केली पाहिजे.
भारतीय जनता पक्षाने एकूण पाच जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन भारतीय जनता पक्षाच्या होत्या. पंकजा मुंडे ह्या त्यापैकीच एक. विधान परिषदेच्या या निवडणुकीत त्या अगदी सहज विजयी झाल्या. त्यांचा विजय कोणत्याही परिस्थितीत होणारच होता. त्यांना विजयी केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस व इतर काही जणांना अन्य पर्यायच नव्हता. कारण 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घडवून आणला होता अशी उघड चर्चा सुरू होती.
त्यांच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामुख्याने बोट दाखवले जात होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. त्यांच्या विजयामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेते आता आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडलेले आहेत. भाजपमधील ओबीसींच्या नेत्या म्हणूनच त्यांची ओळख आहे. ही ओळख अधोरेखित करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आल्याचे दिसते.
बरोबर दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्याचा निकाल लागल्यानंतर त्याच रात्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 13 आमदार अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर काय घडले हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे.
हेही वाचा :
पावसाळ्यात चटकदार चवीसाठी आरोग्यदायी ऑईल फ्री स्नॅक्सची मेजवानी
१०० कोटींचे आमिष: शरद पवारांच्या आमदाराने फोडाफोडीचा धक्कादायक खुलासा केला
सांगली-गोवा महामार्गावर भीषण अपघात : कारची धडक, गोव्यातील महिला जागीच ठार