कोल्हापुरातील नगरसेवक भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्यासाठी इच्छुक पण…

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाला सुरुवात झाली आहे.(Nationalist)अनेक नेत्यांनी पक्षात वजन वाढवण्यासाठी प्रवेशाची तयारी करून ठेवली आहे. अनेकांशी बोलणे झाले आहे; पण जोपर्यंत प्रभागरचना निश्‍चित होऊन आरक्षण पडत नाही, तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचे बहुतांश इच्छुकांची भूमिका दिसून येत आहे. त्यामुळेच भविष्यात कोण कुठे असेल, हे आता सांगणे धाडसाचे ठरणार आहे.निवडणुकीसाठी शासनस्तरावरून आदेश दिल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर राजकीय वर्तुळातही तयारी सुरू आहे. राज्यातील सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यातूनच जे काही तयार आहेत, त्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत.

आणखी काही टप्प्यात प्रवेश होतील, अशी चर्चा आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांनी मेरिट असलेल्या इच्छुकांशी चर्चा केली आहे. काहींनी हिरवा कंदील दाखवला आहे; (Nationalist)पण चार सदस्यीय प्रभाग रचनेत पक्षांना ताकदवान उमेदवारांची गरज भासणार आहे, हे इच्छुकांना माहिती आहे. त्यामुळे निवडून येण्याची सारी ताकद असलेल्या इच्छुकांकडून लवकर पत्ते खुले केले जाणार नाहीत असेच दिसते.त्यासाठी प्रभागरचना, आरक्षण हेही महत्त्‍वाचे मुद्दे कारणीभूत आहेत. अनेक इच्छुकांसाठी मदत असणारे भाग कुठे जातात, शेजारी कोणता भाग येतो हे समजल्यानंतर त्यावर आरक्षणाचा परिणाम काय होणार, हेही तपासले जाणार आहे. त्यामुळेच इच्छुक तयारीत असले तरी त्यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

सध्या प्रवेश केला व त्या पक्षाला त्या प्रभागात उमेदवारी मिळणार नसेल तर तोंडावर कशाला पडायचे ही त्यामागील भूमिका आहे; पण याबरोबरच सध्या इच्छुक कोणत्याही पक्षात दिसत असले तरी निवडणुकीचे सारे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिथे उमेदवारी तिथे प्रवेश, असे समीकरण अवलंबण्याची दाट शक्यता आहे.(Nationalist) त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत अनेक इच्छुकांचा पक्ष स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

उद्या शुक्रवारी बंद राहणार सर्व बँका; जाणून घ्या RBI ने 27 जूनला का दिली आहे सुट्टी

NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल, १५ जुलैपासून लागू होणार नियम

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका