Kolhapur ZP : आखाडा मिनी विधानसभेचा! कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी निवडणूक, चार महिन्यात निवडणुका

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी ६८, तर पंचायत समित्यांसाठी १३६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.(seats )१४ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली जाईल. १८ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे द्यावा, असा आदेश ग्रामविकास विभागाच्‍या सहसचिवांनी आज दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांच्या आत घेण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे.

महापालिका आणि नगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचे तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी गत निवडणुकीत ६७ जागांसाठी निवडणूक झाली. यावेळी एक गट वाढविण्यात आला असून, एकूण ६८ गटांत ही निवडणूक होईल.(seats )दरम्यान, प्रत्येक गट व गणाचे आरक्षण नवीन काढले जाणार आहे. त्याआधी प्रारूप प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे. जिल्हा परिषदेवर अडीच वर्षांहून अधिक काळ प्रशासकराज आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचे या निवडणुकीकडे लक्ष होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून, लवकरच निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जातील.

२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शित्तूर तर्फ वारुण, सरुड, पिशवी, करंजफेण, सातवे, कोडोली, पोर्ले तर्फ ठाणे, यवलूज, कोतोली, कळे, घुणकी, भादोले, कुंभोज, हातकणंगले, शिरोली, रुकडी, कोरोची, कबनूर, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, दानोळी, उदगाव, आलास, शिरोळ, नोंदणी, अब्दुललाट, दत्तवाड, कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, बोरवडे,(seats ) नानीबाई चिखली, कापशी सेनापती, शिये, वडणगे, उचगाव, मुडशिंगी, उजळाईवाडी, पाचगाव, शिंगणापूर, सांगरूळ, सडोली खालसा, परिते, निगवे खालसा, तिसंगी, आसळज, राशिवडे बुद्रुक, कौलव, कसबा वाळवे, सरवडे, राधानगरी, गारगोटी, पिंपळगाव, आकुर्डे, कडगाव, उत्तूर, कोळींद्रे, आजरा, बड्याचीवाडी, हलकर्णी, भडगाव, गिजवणे, नेसरी, चंदगड, माणगांव, तुर्केवाडी, तुडेये असे ६७ गट होते.

प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे : १४ जुलैपर्यंत

जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती : २१ जुलैपर्यंत

प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव : २८ जुलैपर्यंत

प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निर्णय : ११ ऑगस्टपर्यंत

अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे : १८ ऑगस्टपर्यंत

हेही वाचा :