रामदास कदम यांच्या वक्तव्याचे कोल्हापुरात पडसाद, शिवसेनेच्या वतीनं जोडो मारो आंदोलन

minister

कोल्हापूर: दि.२२(प्रतिनिधी) माजी मंत्री (minister ) व शिंदे गटाचे रामदास कदम यांनी मातोश्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद आज कोल्हापुरातही उमटले.जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कदम यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला खेटरांची माळ घालून, जोडमारो आंदोलन केले.यावेळी कदम यांच्या विरोधात शिवसेनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

रामदास कदम यांनी मातोश्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.कोल्हापुरातही शिवसैनिकांनी कदम यांच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला(minister ). यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार,विजय देवणे, रविकिरण इंगवले,सुनील मोदी,हर्षल सुर्वे,मंजित माने,राहुल माळी,रणजित आयरेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Smart News:-