काँग्रेसला मोठा धक्का बसणार! माजी गृहराज्यमंत्री शिवसेनेच्या वाटेवर

काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेमध्ये शिदे गट (Affairs)प्रवेश करण्याचे निश्चित केले असून, ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत पक्षप्रवेश हाेणार आहे. तालुका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या हातीही धन्युषबाण येणार आहे. हाती धन्यष्यबाण येत असल्याने म्हेत्रे राजकीय वेध कोणाचा घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.दिनांक ३१ मे रोजी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे व लोकसभा महिला संपर्क प्रमुख अनिता योगेश माळगे यांच्या समवेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भाजपचे आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने म्हेत्रे यांना उमेदवारी दिली होती. म्हेत्रे पोटनिवडणुक जिंकून आमदार झाले. कॉग्रेसने सलग सात विधानसभा निवडणुकीत म्हेत्रे(Affairs) यांना उमेदवारी दिली.

२००९ मध्ये आमदार सिद्रामप्पा पाटील व २०१९ व २०२४ मध्ये सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून म्हेत्रे यानां पराभव पत्करावा लागला. माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा अक्कलकोट तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. म्हेत्रे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती, मात्र ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हेत्रे समर्थक कार्यकर्त्यासह शिवसेना शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.दरम्यान शिंदे गटाला म्हेत्रे (Affairs)यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात जाणकार नेता मिळत असल्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. याचा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

काही विवाह भयानक असतात… Video Viral