काही विवाह भयानक असतात… Video Viral

लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांना फक्त प्रेमच देतात, अस जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी वाचाच… उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी दुचाकीवरून प्रवास करत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, पती आपल्या पत्नीला त्याच्या बाईकवरून कुठेतरी घेऊन जात आहे… व्हिडिओ इथेच संपत नाही, कॅमेरा जसजसा जवळ जातो तसतसे जे पाहाल ते धक्कादायक…!

व्हिडिओमध्ये, पती दुचाकी चालवत आहे. त्याची पत्नी त्याच्या मागे बसलेली आहे. अचानक ती त्याला चप्पलने मारू लागते. प्रथम, ती त्याच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला मारते, नंतर डावीकडे वळते आणि रस्त्याच्या कडेला काहीतरी दाखवते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पती काहीच प्रतिक्रिया देत नाही. तो काहीही न बोलता फक्त गाडी चालवत राहतो. पती मात्र त्याच्या डोक्यात आणि तोंडावर चप्पलने मारतच राहते.

हा व्हिडिओ ‘घर के कलेश’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. ही घटना भररस्त्यात सुरू असते. २१ सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्यांच्यातील भांडणाचे नेमके कारण उघड झालेले नसले तरी, व्हिडिओमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये जोरदार वादविवाद सुरू आहेत.