कोल्हापूरच्या हुकमी एक्क्याने ठाकरेंची साथ सोडली, पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण बदलणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक(western) नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काही महिन्यांत या निवडणुका पार पडणार असून, सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना मोठे राजकीय धक्के सहन करावे लागले आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरात शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नाराजीही व्यक्त केली.

शिवसेनेमध्ये अस्तित्वाचा संघर्ष तीव्र होण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. २०२२ साली राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. संभाजी राजे यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हाच शिवसेना फुटली. त्यानंतर आता संजय पवार यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी थेट आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

यादरम्यान, संजय पवार यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली. इंगवले यांच्या नियुक्तीवर नाराज असून, ‘इथून पुढेही उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करीत राहीन’ असं त्यांनी म्हटलं आहे. पवार यांनी राजीनामा देताना आपली खदखद व्यक्त केली. ‘शिवसेनेमध्ये उपनेते हे तिसऱ्या क्रमाकांचे पद आहे, (western)असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरील निवड प्रक्रियेत आपल्याला कुठल्याही पद्धतीची माहिती देण्यात आली नसल्याचं पवार म्हणाले.

तसेच ‘निवड झाल्यानंतर विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे या पद्धतीवर तीव्र नाराज असून, उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं’, असं पवार म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ‘जर मी उपनेता पदावर असून, शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नसलो, तर या पदाचा मला काहीही उपयोग नाही, मी जरी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला, तरी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणार आहे, असं संजय पवार म्हणालेत.

दरम्यान, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी विश्वास व्यक्त करत सांगितलं की, ‘संजय पवार यांनी जरी उपनेते पदाचा राजीनामा दिला असला, तरी ते दोन दिवसांत राजीनामा माघार घेतील आणि पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय होतील. पक्षाने घेतलेल्या निर्णयांवर सध्या संजय पवार नाराज आहेत. (western)पण त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी मी त्यांना विनंती केली असल्याचं देवणे म्हणालेत.

हेही वाचा :

लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट

ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral

बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral