लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.(scheme) मागच्या वर्षी २९ जून रोजी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवण्यात आली होती. या योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. दरम्यान, योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत किती पैसे मिळाले तसेच योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडक्या बहिणींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹ ३००० होणार जमा
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती पैसे जमा झाले?
लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.(scheme) आतापर्यंत महिलांच्या खात्यात १२ हप्ते जमा झाले आहेत. एका वर्षात १८००० रुपये जमा झाले आहेत. या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळत आहे. अपात्र महिलांना योजनेतून बाद केले जात आहे.
अजूनही अर्ज करता येणार का?
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती.(scheme) त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अर्जप्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करता येणार नाही. तसेच ही अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आनंदाची बातमी! लाडकीच्या खात्यात आजपासून ₹ १५०० खटाखट जमा होणार; अजित पवारांची घोषणा
लाडकी बहीण योजनेचे नियम
लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
१८ ते ६० वयोगटातील महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो.
लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन नसावे.
महिला सरकारी कर्मचारी नसावी.
लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..