इचलकरंजी – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौं. रूपालीताई चाकणकर सोमवारी इचलकरंजी शहरात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यभर महिला सक्षमीकरण उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून “सक्षम तू” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन इचलकरंजीत करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपालीताई चाकणकर या उपस्थित राहणार आहेत.
गणेश नगरमधील अशोका सायझिंग येथे सोमवार दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. महिलांच्या अधिकार, संरक्षण, आणि सक्षमीकरणावर आधारित विविध सत्रांद्वारे महिलांना माहिती व प्रेरणा देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे या महिलांच्या सुरक्षेसंबंधित विषयांवर मार्गदर्शन करणार असून, निर्भया पथक, टोल फ्री क्रमांक याविषयी माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमात अनेक मान्यवर पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
शहरातील सर्व महिला व युवतींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर सोमवारी इचलकरंजीत
