मोठी दुर्घटना, लष्कराच्या वाहनावर कोसळली दरड, २ अधिकारी शहीद

लडाखमधील गलवानच्या चारबाग भागात एक मोठा अपघात(accident) झाला आहे. लष्कराच्या वाहनावर मोठा दगड कोसळला असून दोन अधिकारी शहीद झाले आहेत आणि तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. जखमींना विमानाने हॉस्पिटलपर्यंत पोहचोवण्यात आलं आहे. जखमींमध्ये २ मेजर आणि १ कॅप्टनचा समावेश आहे. सैनिकांचा ताफा दुर्बुक ते चोंगटास येथे प्रशिक्षणासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास हा अपघात(accident) घडला. लष्कराच्या वाहनांचा ताफा दुर्बुक ते चोंगटासकडे जात होता. त्यावेळी अचानक दरड कोसळली. यामध्ये १४ सिंध हॉर्सचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग शहीद झाले आहेत. तर मेजर मयंक शुभम (१४ सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (६० सशस्त्र) जखमी आहेत.

अलिकडच्या काही महिन्यांतील लष्करी वाहनासोबतचा हा एक मोठा अपघात आहे. या वर्षी मे महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात लष्कराचे एका मोठ्या वाहनाचा अपघात झाला होता. जिल्ह्यातील बॅटरी चष्माजवळ लष्कराचा ट्रक २००-३०० मीटर खोल खड्ड्यात कोसळला होता. या अपघातात ३ जवान शहीद झाले. लष्कराचा ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता.

हेही वाचा :

मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान

सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता जमा; 5 कोटी 73 लाखांहून अधिक रक्कमेचा आर्थिक दिलासा