वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी सत्तेत आल्यानंतर अवैध प्रवाशांविरोधात कडक कारवाई केली. अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांनी देशातून हाकलून लावले आहे. तसेच व्हिसा नियमही कडक केले आहे. दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर मोठी कारवाई केली आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतीय ट्रॅव्हल एजन्सीवर कठोर कारवाई केली आहे. अमेरिकेन भारतीय ट्रॅव्हल एजन्सीवर बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्सहन दिल्याचा आरोप केला आहे.

याअंतर्गत ट्रॅव्हल एजन्सींच्या मालकांवर, सीईओंवर व्हिसा बंदी लागू केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने निवेदन जारी करत सांगितले की, ‘मिशन इंडिया’ अंतर्गत असणारे ‘कॉन्सुलर अफेयर्स अँड डिप्लोमॅटिक सिक्युरिटी’ हे आमच्या दूतावासामध्ये बेकायदेशीर स्थलांतर आणि मानवी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करत आहे.
तसेच निवेदनात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, अवैध प्रवाशांचे स्थलांतर रोखण्यासाठी भारतातील ट्रॅव्हल एजन्सी मालकांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लागू करण्यात येत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे की, ट्रम्प(Donald Trump) प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणाचा उद्देश विदेशी नागरिकांना बेकायदेशीर इमिग्रेशनच्या धोक्यांबद्दल जागरुक करणे, तसेच अमेरिकन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना योग्य शिक्षा देणे आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, हा निर्यण अमेरिकन कायद्याचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे. अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इमिग्रेशन कायदे आणि धोरण लागू करणे महत्त्वाचे आहे.

अमेरिकन परराष्ट्र विभागेन हेही म्हटले आहे की, व्हिसा धोरण केवळ भारतापुरतेच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील लागू करण्यात येत आहे. तसेच व्हिसा व्हेवर प्रोग्रामसाठी प्रात्र असलेल्यांनाही हे नियम लागू होतात.
याच वेळी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या एका अधिकाऱ्याला निर्बंध लागू करण्यात आलेल्या ट्रॅव्हल एजन्सी आणि लोकांच्या व्हिसा संबंधी माहिती विचारली. परंतु अधिकाऱ्याने कोणतीही सविस्तर माहिती देता येणार नाही असे म्हटले. अमेरिका व्हिसा रेकॉर्डच्या गोपनियतेमुळे कोणतीही माहिती प्रसारित करणार नसल्याचे अधिकाऱ्याने म्हटले.
हेही वाचा :
तपास अधिकार पोलिसाला काही अटी अन काही प्रश्न
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुण्यातही सापडला रुग्ण; सरकार घेणार मोठा निर्णय?
माता न तू वैरीणी! ‘ती’ वेदनेने ओरडत होती…, आईच्या प्रियकरानेच अडीच वर्षाच्या लेकीवर केला बलात्कार