सकाळच्या नाश्त्यात नेहमीच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा (food)आल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवू शकता. हा पदार्थ पचनासाठी अतिशय हलका आहे.

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच प्रत्येकाला काहींना काही चमचमीत (food)पदार्थ खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात नेहमीच पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवू शकता. मुगाची आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. याशिवाय मुगाची डाळ सहज पचन होते. बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने अनेक लोक नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
मुगाची डाळ
हिंग
आलं लसूण पेस्ट
हिरवी मिरची
मीठ
तेल
जिरं
कोथिंबीर
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल कोहळ्याचं सूप! चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, नोट करून घ्या रेसिपी
कृती:
मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर(food) मुगाची डाळ चार ते पाच तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि जिरं, हिंग टाकून बारीक पेस्ट तयार करा.
तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा.
गरम तव्यावर तेल टाकून लहान लहान आकाराचे चिल्ला बनवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मुगाच्या डाळीचा चिल्ला. हा पदार्थ तुम्ही सॉससोबत खाऊ शकता.
हेही वाचा :
महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य