महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…

संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत पाण्याची गळती होत (leakage)आहे. वेरूळमधील 32 क्रमांकाच्या लेणीत पाण्याची गळती होत आहे. पाण्याच्या गळतीमुळे पेंटिंग धोक्यात आले आहेत. वेरूळ लेणीचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश आहे. येथे हिंदू, जैन आणि बौद्ध लेण्या पाहायला मिळतात.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ आणि अजिंठा लेणी हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्रातील हेच जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात आले आहे. वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती होत धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे या पर्यटनस्थळाला धोका निर्माण झाला आहे. ऐतिहासािक वारसा लाभलेली ही लेणी हजारो वर्ष जुनी आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमध्ये(leakage) पाण्याची गळती झाल्याने गंभीर चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः जैन गुहा क्रमांक 32 मधील ही गळती होत असल्याचे पहायला मिळत आहे. ९ व्या शतकातील दुर्मिळ भिंतीवरील चित्रांना धोका निर्माण करत आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण च्या अधिकाऱ्यांनीही या गळतीची पुष्टी केली आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे वर्णन केले आहे, परंतु तज्ञांचे मत आहे की जर वेळेत योग्य पावले उचलली गेली नाहीत तर ऐतिहासिक वारशाचे नुकसान होऊ शकते.

वेरूळच्या लेण्या छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहेत. येथे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या कलांचा एक अनोखा संगम पहायला मिळतो. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. यातील बहुतेक लेण्या दगड कापून बनवल्या आहेत. त्यामध्ये कोरीवकाम, शिल्पकला आणि चित्रकलेचा अद्धभूत नमुना पहायला मिळतो.

एका स्थानिक पर्यटक मार्गदर्शकाच्या मते, गेल्या वर्षी जैन(leakage) गुहा क्रमांक 32 मध्ये अशीच गळती दिसून आली होती, त्यानंतर काही दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, परंतु ते पूर्णपणे प्रभावी झाले नाही. आता पुन्हा पाणी गळू लागले आहे, ज्यामुळे आतील चित्रांना नुकसान होऊ शकते.

ही गळती नैसर्गिकरित्या झाली आहे आणि आम्ही या प्रकरणाची माहिती संवर्धन विभागाला आधीच दिली आहे. लवकरच याची चौकशी केली जाईल असे एएसआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याच वेळी, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज चे सह-संयोजक स्वप्नील जोशी म्हणाले की, वेरूळची तुलना अजंठा लेण्यांशी करणे योग्य ठरणार नाही, कारण वेरूळमधील फारच कमी गुहांमध्ये चित्रे आढळतात. आम्ही यापूर्वीही ASI ला पत्र लिहिले होते. जर अजूनही पाणी गळत असेल तर ते त्वरित सोडवले पाहिजे. जर गळतीची समस्या लवकर थांबवली नाही तर शतकानुशतके जुन्या कलाकृतींचे नुकसान होऊ शकते.

हेही वाचा :

लहान मुलांमध्ये हार्टअटॅकचा धोका वाढला, कारण काय? VIDEO
Asia Cup 2025 स्पर्धेत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं होणार, नक्की काय?
‘एमपीएससी’: गट-क संयुक्त परीक्षेचा निकाल जाहीर पण… आयोगाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती