महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ०१ जून, २०२५ रोजी(examination) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. मात्र मुख्य परीक्षेनंतर निकालावर न्यायालयाचा काय परिणाम होणार याची माहिती देखील आयोगाने दिली आहे. या निकालाद्वारे मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात(examination) दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल,असेही सूचित करण्यात आले आहे. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करता येऊ शकते असेही सांगण्यात आले आहे. मुख्य परीक्षा दिनांक २१ सप्टेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
.@mpsc_office मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 6, 2025
मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://t.co/dnEj40xmuR या संकेतस्थळावर प्रसिद्ध… pic.twitter.com/uhd8xO5eYF
या पूर्व परीक्षेचा निकाल विविध न्यायालयात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज द्वारे कळविण्यात येईल.
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन(examination) पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह असेही नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा :
सकाळी उठल्यानंतरर उपाशी पोटी आंबट फळांचा रस प्यावा की नाही? नियमित सेवन केल्यास उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या
आजचा गुरूवार राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने भाग्य सोन्यासारखं उजळणार, आजचे राशीभविष्य वाचा
कशाला पेट्रोलच्या नादी लागावं ! आता फक्त 13 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल देशातील सर्वात स्वस्त EV