राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. (delicious)सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. यादिवशी आरोग्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. आहारात उष्ण आणि पचनास अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन केले जाते. जेवणाच्या ताटात काहींना नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास लागतात. भाजी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे राईस विकत आणून खाल्ले जातात. मात्र विकत मिळणारे पदार्थ बनवताना कोणतेही कमी दर्जाचे तेल किंवा इतर साहित्य वापरले जाते. अशावेळी घरातच चमचमीत भाज्या बनवून खाव्यात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाल भोपळ्याचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लाल भोपळा चवीला अतिशय गोड असतो, त्यामुळे अनेक लोक भोपळा खाण्यास नकार देतात. पण लाल भोपळा शरीरात वाढलेली युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लाल भोपळ्याच्या भाजीचे तुम्ही सेवन करू शकता. जाणून घ्या लाल भोपळ्याचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.

शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये (delicious)सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा
साहित्य:
लाल भोपळा
दही
जिरं
हिरवी मिरची
तूप
शेंगदाण्याचा कूट
साखर
कढीपत्ता
हळद
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा, नोट करून घ्या पदार्थ
कृती:
लाल भोपळ्याचं भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम, भोपळा स्वच्छ धुवून (delicious)वरील साल काढून घ्या. त्यानंतर भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे करा.
टोपात पाणी घेऊन त्यात तुकडे करून घेतलेला भोपळा टाकून शिजवा. भोपळा शिजवताना त्यात थोडस मीठ टाकावे.
मोठ्या वाटीमध्ये शिजवून घेतलेला भोपळा घेऊन मॅश करा. त्यानंतर त्यात चवीनुसार साखर घाला.
चमचाभर गोड दही, शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
फोडणीच्या वाटीमध्ये तूप गरम करून त्यात जिरं, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हळद घालून फोडणी भाजा आणि गॅस बंद करा.
तयार केलेली फोडणी भोपळ्याच्या मिश्रणात टाकून व्यवस्थित मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले लाल भोपळ्याचे भरीत. गरमागरम भाकरीसोबत हा पदार्थ खूप सुंदर लागेल.
हेही वाचा :
आषाढ अमावस्येचा दुर्लभ योग बदलणार भाग्य, आजचे राशीभविष्य वाचा
कुकरमध्ये वाटणाशिवाय बनवा झणझणीत स्मोकी चिकन लेग मसाला; अगदी हॉटेलसारखी चव घरात!
बेडसे लेणं हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर काळाच्या दगडांमध्ये साठवलेलं अज्ञात इतिहासाचं स्पंदन