मार्केट स्टाईल सर्वांच्या आवडीचा लसूण चिवडा आता घरीच बनवा; व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

लसूण चिवडा हा एक स्नॅक्सचा पदार्थ आहे जो मार्केटमध्ये उपलब्ध असतो.(garlic) हा चिवडा बऱ्याचदा सणासुदीच्या काळात, विशेषतः दिवाळीत घरी देखील बनवला जातो. लसणाची झणझणीत चव त्यासह मसालेदार आणि कुरकुरीत शेव यांचा सुंदर संगम चवीला फार छान लागतो. चवीलाच नाही तर सुगंधानेही मन प्रसन्न करणारा हा चिवडा खूपच टिकाऊ असल्यामुळे डब्यात साठवून ठेवता येतो आणि कधीही खाण्यासाठी तयार असतो.

लसूण चिवडा हा फार आधीपासूनचा सर्वांच्या आवडीचा चिवडा आहे. आपण विकत घेऊन तर हा चिवडा बऱ्याचदा खाल्ला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का?(garlic) हा चिवडा घरी देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार केला जाऊ शकतो. सोशल मीडियावर याची एक भन्नाट रेसिपी शेअर करण्यात आली आहे जी आपण या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
बेसन पीठ 400 ग्रॅम
तांदूळ पावडर 50 ग्रॅम
हळद पावडर
मीठ
पाणी
तेल
लसूण
कढीपत्ता
काश्मिरी लाल मिरची पावडर २ चमचे
हिंग
मीठ

कृती
लसणाचा चिवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका परातीत बेसन पीठ (garlic)आणि तांदळाचं पीठ एकत्र करा
यानंतर यात मीठ, हळद घालून एकत्र करून चांगलं मळून घ्या
मळलेलं पीठ कुरडईच्या साच्यात भरून घ्या
आता गॅसवर एका कढईत तेल गरम करा
तेल गरम झाले की साच्याच्या मदतीने डायरेक्ट यात शेव पाडा आणि छान कुरकुरीत तळून घ्या
शेव तळून झाली की यात पिठाची बारीक बुंदी करून तळून घ्या
यांनतर त्याच तेलात लसूण, शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून घ्या
एका भांड्यात तळलेली शेव घालून बारीक चुरा करा, त्यात शेंगदाणे, कढीपत्ता, मीठ, मसाले घालून एकत्र करून घ्या.
तयार खमंग आणि कुरकुरीत लसूण चिवडा एका हवाबंद डब्यात बंद भरून ठेवा
हा चिवडा तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता

हेही वाचा :

मध्यपूर्वेतील संघर्ष थांबला शस्त्र संधी कायमची टिकेल?

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात सुरू होणार सी-प्लेनची सुविधा

कनवाड येथे कृष्णा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या ११ एकर शेतीची आमदार यड्रावकर यांच्याकडून पाहणी – तातडीने पंचनाम्याचे आदेश