आषाढी एकादशी हा पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीचा(occasion)आणि उपवासाचा पवित्र सण आहे. यंदा 6 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. यंदा एकादशीला उपवासात चविष्ट आणि सात्त्विक पदार्थ बनवण्याची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ पौष्टिक आणि सोपे असावेत असे प्रत्येकाला वाटते. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तात, विठ्ठल भक्ती आणि उपवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही उपवासाचे आलू पराठे तयार करु शकता. चला तर मग जाणून घेऊया उपवासाचे आलू पराठे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

उपवासाचे आलू पराठे बनवण्यासाठी (occasion)लागणारे साहित्य
बटाटे
साबुदाणा
हिरवी मिरची
पाणी
तूप
शेंगदाणा कुट
लाल मिरच्या
मीठ
चिंच
उपवासाचे आलू पराठे बनवण्याची कृती
उपवासाचे आलू पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणा ७ते ८ मिनिटे मध्यम हॅसवर(occasion)भाजून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या आणि चाळणीत गाळून घ्यावे. नंतर यात मीठ, आलं, जिरं, मिरची पेस्ट,उकडलेले बटाटे, पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्यावे. नंतर पराठे लाटून घ्यावे. गरम तव्यावर उपवासाचे आलू पराठे भाजून घ्यावे. उपवासाचा आलू पराठा तयार आहे.
उपवासाची शेंगदाणा चटणी
यासाठी सर्वात आधी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, हिरवी मिरची, मीठ, चिंच, थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा. नंतर एक पॅनमध्ये तुप, जिरे, लाल सुकी मिरची टाकून तडका द्या.
हेही वाचा :
भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार
Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट