या वेळेस गटारीसाठी घरच्या घरी कमी वेळेत चिकनची कोणती रेसिपी तयार(recipe) करावी हे विचार करत असाल तर, ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तर जाणून घेऊयात झणझणीत चिकन लेग मसालाची रेसिपी आणि तेही वाटणाशिवाय.

बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हटलं की नॉनव्हेज प्रेमी सकाळीच बाजारात जातात आणि चिकन, मटण किंवा मासे घेऊन येतात. मात्र चिकन आणल्यावर दरवेळी तोच पारंपरिक रस्सा खाण्याचा कंटाळा(recipe) येतो. अशा वेळी ही खास झणझणीत आणि स्मोकी चव असलेली ‘वाटणाशिवाय चिकन लेग मसाला’ रेसिपी नक्की करून बघा. ही रेसिपी कुकरमध्ये झटपट तयार होते आणि चव मात्र हॉटेललाही लाजवेल.
साहित्य
अर्धा किलो चिकन लेग पिस
एक वाटी दही
चिकन मसाला
बारीक चिरलेली कोथिंबीर
तमालपत्र, 2-4 वेलची, लवंग
मीठ
तेल
आलं-लसूण पेस्ट
1 टीस्पून हळद
2 टीस्पून काश्मिरी तिखट
2 मध्यम कांदे उभे चिरलेले
1 टोमॅटो बारीक चिरलेला
2 हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या
1 टीस्पून धने-जिरे पावडर
1 टीस्पून गरम मसाला
1 लहान तुकडा कोळसा स्मोकसाठी
कृती
एका मोठ्या भांड्यात चिकन लेग पिस घ्या. त्यात दही, हळद, तिखट, (recipe) मीठ, गरम मसाला, चिकन मसाला, आलं- लसूण पेस्ट आणि धने-जिरे पावडर घालून नीट मॅरिनेट करा. यानंतर कोळसा गॅसवर चांगला तापवा. एक वाटीत किंवा फॉईलमध्ये तो कोळसा ठेवून त्यावर 1/2 टीस्पून तूप ओता आणि चिकनच्या भांड्यात ठेवून झाकण ठेवा. 30 मिनिटे झाकून ठेवल्याने चिकनला स्मोकी फ्लेवर येईल. आता कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात तमालपत्र, वेलची, लवंग घाला. त्यानंतर त्यात कांदा घालून परतून घ्या. तो गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता. टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात थोडं मीठ, हळद, तिखट आणि मसाले घाला. मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाका आणि सगळं एकजीव करा. यानंतर कुकरचं झाकण लावा आणि मंद आचेवर 2 शिट्ट्या करा. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा. चिकन शिजलं असेल तर थोडं पाणी घालून गरज असल्यास 5-7 मिनिटं मंद आचेवर परता.
आता हे चिकन लगेचंच ताटामध्ये वाढून त्यावर कोथिंबीर घाला आणि गरमा गरम सर्व्ह करा. हा चिकन लेग मसाला तुम्ही भात, भाकरी किंवा नुसता सुद्धा खाऊ शकतात. या चिकनला कोळशाचा फ्लेवर त्याला एकदम हटके चव देतो.
हेही वाचा :
एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं
क्षणातच शार्क माशाने व्यक्तीला चावून चावून खाल्लं; रक्तरंजित पाणी अन् Video Viral
शॉकिंग! रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण; शिवीगाळ करत विनयभंग