राष्ट्रपती भवनाजवळ नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाला मिळाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिल्लीत राष्ट्रपती भवनाजवळील नॉर्थ ब्लॉक परिसरात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. (North Block) आग लागल्यानंतर परिसराच्या आकाशात धुराचे काळे लोट दिसून आले.

दिल्ली अग्निशमन दलाला नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (North Block) आगीमुळे नेमकं किती नुकसान झालं आहे किंवा कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही या घटनेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिली आहे. संसदेकडे जात असताना नॉर्थ ब्लॉकच्या मागील बाजूने दाट धूर उठताना दिसल्याचं त्यांनी सांगितलं. तिथे आग लागल्याचं दिसत असून सर्वजण सुरक्षित असावेत अशी प्रार्थनाही केली. देवरा यांनी या घटनेचा एक फोटोही शेअर केला आहे. (North Block) त्यामध्ये नॉर्थ ब्लॉकच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात धूर उठताना दिसत आहे.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा