महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.(health) विशेषतः वयाच्या चाळिशी-पन्नाशीच्या आसपास शरीरात जे नैसर्गिक बदल घडतात, त्यात ‘मेनोपॉज’ हा मोठा टप्पा असतो. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक शारीरिक व मानसिक त्रास जाणवतात, जसे की अचानक येणारा उष्णतेचा झटका, मूड स्विंग्ज, चिंता, झोपेचा त्रास.

माझ्या ऑनलाइन योगा क्लासमध्ये मी खास या वयोगटातील स्त्रियांसाठी प्राणायाम, ध्यानधारणा, योगनिद्रा असे वेगळे सत्र घेते. या काळात योग्य जीवनशैली, योग, प्राणायाम, आहार आणि ध्यान यांचा(health) अंगीकार केल्यास त्रासावर मात करता येते.
योगासने व फायदे
ताडासन : शरीराचा समतोल साधतो, झोप सुधारतो.
त्रिकोणासन : पाठीच्या, कंबरेच्या व पोटाच्या स्नायूंना बळकटी देतो.
वीरभद्रासन : मनोबल वाढतो, थकवा कमी होतो.
भुजंगासन : पाठीचा लवचिकपणा वाढतो व हार्मोन बॅलन्स होतो.
बालासन : मनाला शांती व झोपेची गुणवत्ता सुधारते.
योगासने कशी करावीत?
प्रत्येक आसन ३०-४० सेकंद धरून ठेवा.(health) रोज ३० मिनिटांचा सराव ठरवून करा.
प्राणायाम व ध्यान
चंद्रभेदी प्राणायाम : शरीरात थंडावा निर्माण करतो, हॉट फ्लॅशेस कमी होतात.
नाडी शुद्धी प्राणायाम : शरीरातील उष्णता नियंत्रित होते व तणाव कमी होतो.
भ्रामरी प्राणायाम : मनःशांती व शांत झोप मिळते.
गायडेड मेडिटेशन : मनाच्या गोंधळलेल्या विचारांना विराम देतो. रोज किमान १५ मिनिटे प्राणायाम व ध्यान करणे फायदेशीर ठरते.
आहारातील महत्त्वाचे बदल
सोया प्रोटिन : यामध्ये फाइटोएस्ट्रोजन असल्याने हार्मोनल समतोल साधतो.
कॅल्शियम व व्हिटॅमिन डी : हाडं बळकट होतात.
ओमेगा ३ फॅटी ॲसिड : मूड स्विंग्ज नियंत्रित करतो.
होल ग्रेन्स, फळं, भाज्या : पोषण देतात व पचनशक्ती सुधारतात.
भरपूर पाणी : शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवते.
दिनचर्या
सकाळी लवकर उठून सूर्यप्रकाशात वेळ घालवा. रोज चालणे, योगाभ्यास ठराविक वेळेला करावा.
झोपेची वेळ ठरवून पाळा. सोशल मीडिया व स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा. छंद जोपासा, मैत्रिणींसोबत वेळ घालवा.
मानसिक दृष्टिकोन
मेनोपॉज हा नैसर्गिक बदल आहे, त्याकडे भीतीने पाहण्यापेक्षा सजगतेने सामोरे जा. स्वतःला वेळ द्या, शरीराचा आवाज ऐका आणि आयुष्याचा हा नवीन टप्पा सकारात्मकतेने जगा.
हेही वाचा :
कोल्हापूर: प्रेमाच्या त्रिकोणातून खून, अल्पवयीन संशयिताच्या दारात ४० -५० बायका गेल्या अन्
सांगलीत अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मत चोरी; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुन्हा गंभीर आरोप