कराडमधून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. शहरातील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे(doctors) AI च्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवले गेल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओ बनावट असून, परराज्यातून तयार करण्यात आले असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कराड शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यामागचा सूत्रधार स्वतःला ‘डॉक्टर’ असल्याचं सांगतो, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
AI वापरून खोटे व्हिडीओ; पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती उघड :
पंधरा दिवसांपूर्वी दोन महिला डॉक्टरांनी(doctors) कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सोशल मीडियावर त्यांचे अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. तपासाअंती हे व्हिडीओ AI तंत्रज्ञानाने बनवले गेले असून, त्यात संबंधित डॉक्टर महिलांना दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह कृती करताना दाखवलं गेलं होतं.
तपासादरम्यान पंजाबमधील विकास शर्मा या इसमाचा तपासात सहभाग निष्पन्न झाला असून, त्याने कबुल केलं की कराडमधीलच एक डॉक्टर राजेश शिंदे यानेच हे व्हिडीओ तयार करण्याची योजना आखली होती. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त करून तपास सुरू केला आहे.
विकास शर्माने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, आर्थिक अडचणीमुळे त्याने हे काम केलं. आरोपी राजेश शिंदे याने त्याला काही मोबाईल क्रमांक पाठवले व त्या नंबरचे गट तयार करून अश्लील व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. यानंतर एआयच्या सहाय्याने खोटे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.
या बनावट व्हिडीओंमुळे संबंधित महिला डॉक्टरांच्या(doctors) प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकला असता, मात्र त्यांनी वेळेवर पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे व्हिडीओ व्हायरल होण्याआधीच नियंत्रण मिळवता आलं.
कराड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर क्राईम युनिटच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा लावण्यात आला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व सहकारी दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हा प्रकार म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक कसा घातक ठरू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. Deepfake AI तंत्रज्ञानाचा वापर करून कुणाच्याही फोटोवर अश्लील क्लिप्स तयार करता येतात. त्यामुळे सोशल मीडियावर आपले खाजगी फोटो, व्हिडीओ अपलोड करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
हेही वाचा :