जनतेचा शाहू महाराज यांच्या विचारांवर विश्वास आहे. आता असलेल्या सरकारबद्दल(anti inflammatory) चिड आम्हाला महाराष्ट्रात दिसत आहे. यंदा तरूणवर्ग कोणत्याही भावनेच्या भरात न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल. महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील आणि देशात एक चांगला संदेश जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार(anti inflammatory) श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
रोहित पाटील म्हणाले, “शाहू छत्रपती यांच्या गादीला विरोध करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापुरात यावं लागतं. हा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आहे. नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं. तरूणांची माथी कशी भडकतील याची दक्षता घेण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला.”
सांगलीतील महाविकास आघाडीच्या वादावरही रोहित पाटील यांनी भाष्य केलं आहे. रोहित पाटील यांनी म्हटलं, “सांगलीच्या वादासाठी जयंत पाटील जबाबदार असतील, असं मला वाटत नाही. घरातील नवरा-बायकोची भांडण बोलल्यानंतर मिटतात, असं मी ऐकलं आहे. मात्र, माझं अजून लग्न झालं नाही. सांगलीबद्दल झालेले गैरसमज लवकरच दूर होतील. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल, यासाठी प्रयत्न करतोय.”
हेही वाचा :
कोरोना संकटातच कोल्हे राजीनामा घेऊन आले होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंचा दणका; काँग्रेस शहराध्यक्ष्यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!
उत्तराखंडात वणव्यात 82 एकर जंगल खाक; लष्कर आणि हवाई दल मदतीला