चारच दिवसात पैसा डबल; या शेअरने बाजारात आणले तुफान

अमेरिकेन अर्थ मटेरियल्स कंपनी, MP Materials Corp ने शेअर बाजारात धमाका केला आहे.(created)कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 4 व्यापारी सत्रात 100 टक्के परतावा दिला आहे. मंगळवारी, 15 जुलै 2025 रोजी शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्यामुळे या शेअरची किंमत इंट्राडेवर 61.72 डॉलरवर पोहचला. बुधवारी शेअरमध्ये चढउतार दिसला. पण या घडामोडींमुळे शेअर गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

MP Materials Corp एक मोठी अमेरिकन कंपनी आहे. ही कंपनी रेअर अर्थ मटेरियल्स म्हणजे दुर्मीळ धातू काढते आणि त्यावर प्रक्रिया करते. हा धातू दुर्मीळ आहे. पण सध्याच्या तांत्रिक युगात त्याला मागणी अधिक आहे.(created) इलेक्ट्रिक वाहनं, विंड टर्बाईन, स्मार्टफोन आणि लष्करी वापरासाठीच्या उपकरणात त्याचा सर्वाधिक वापर होतो. अमेरिकेतील माऊंटेन पास या खाणीत हा धातू मिळतो. ही कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. MP Materials खासकरून नियोडिमियम आणि प्रासियोडिमियमवर जोर देते. हे धातू चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येते.

हा शेअर का तेजीत आला याची माहिती समोर आलेली नाही. दूर्मिळ धातुचा वापर वाढल्याने त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. या कारणामुळे हा शेअर तेजीत आल्याचा दावा करण्यात येत आहे. ग्रीन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिक वाहन, आणि रिन्यूएबल एनर्जी या क्षेत्रात या धातूची मागणी वाढली आहे.(created) नवीन प्रकल्प वा भागधारक कंपन्या सतत वाढत आहेत. या कंपनीमुळे चीनवरील अमेरिकेचे अवलंबित्व कमी झाले आहेत. या शेअरने मोठी भरारी घेतल्याने MP Materials ने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.

काही तज्ज्ञांच्या मते भविष्यात MP Materials Corp च्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही सध्याची स्थिती पाहता काही तज्ज्ञांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एकदम भरारी घेणारे शेअर्स अचानक जमिनीवर आपटतात. त्यामुळे जोखीम घेताना कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा शेअर भविष्यात उसळी घेईल की नाही हे पाहण्यासाठी बाजाराची काय स्थिती आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी

‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका

कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली