करमाळा (२६ जुलै) – कारगिल विजय दिनानिमित्त आज करमाळा येथे(honored)आयोजित विशेष कार्यक्रमात जिव्हाळा ग्रुपचे संस्थापक सदस्य आणि शेटफळ गावचे सुपुत्र नवनाथ नाईकनवरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल ‘विशेष युवा योद्धा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार करमाळा तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित समारंभात, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, त्यांच्या हस्ते नाईकनवरे यांना प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या नवनाथ नाईकनवरे यांनी समाजसेवेचा वसा जपत ग्रामीण भागातील युवकांमध्ये नेतृत्व विकसित करणे, राष्ट्रभक्ती आणि समाजप्रेमाचे बळ रुजवणे या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.(honored) त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन ‘विशेष युवा योद्धा पुरस्कार’ देण्यात आला.

कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी नाईकनवरे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. (honored)या पुरस्कारामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन समाजहिताच्या दिशेने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा :
मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर नाराज, अनेकांना डच्चू मिळणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
बचतीसोबत मिळवा संरक्षण, LIC च्या ‘या’ विमा पॉलिसी जाणून घ्या