इचलकरंजी महापालिकेचा नवा उपक्रम – सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता थेट कारवाई!

इचलकरंजी शहरातील स्वच्छता आणि नागरी शिस्तीला चालना देण्यासाठी इचलकरंजी महापालिकेने(municipal corporation)एक नवीन आणि धडक उपक्रम सुरू केला आहे. यानुसार, शहरातील रस्त्यावर अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा फोटो काढून थेट महापालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर (7030603939) पाठविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.



या उपक्रमांतर्गत, संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, फोटो पाठवणाऱ्या नागरिकांना दंडाच्या वसुलीमधून २०% रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी सजग नागरिकांच्या सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, कचरा टाकणाऱ्यांचा फोटो महापालिकेच्या(municipal corporation) अधिकृत सोशल मीडिया पेजेसवर प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यामुळे संबंधित व्यक्तीची समाजात नामुष्की होण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक पल्वी पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, “कचरा घंटागाडीतच टाका, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा.”

तुमचं शहर, तुमची जबाबदारी – फोटो पाठवा, शहर स्वच्छ ठेवा आणि पैसे कमवा!
– इचलकरंजी महानगरपालिका

हेही वाचा :