‘बॉस माझी लाडाची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आयुष संजीवने(household art) इन्स्टाग्रामवर निलेशच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ हा टेलिव्हिजन कॉमेडी शो गेल्या १० वर्षांपासून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहे. या शोने कोरोना काळातही चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले. आता लवकरच या शोचा नवा (household art)सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. या नव्या सीझनचा होस्ट बदली होणार आहे. होस्ट निलेश साबळेची जागा आता अभिनेता अभिजित खांडकेकर घेणार आहे.
‘चला हवा येऊ द्या २’मधून निलेश साबळेने एक्झिट घेतल्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी निलेशवर डोक्यात हवा गेली, त्यामुळे झी मराठीने डच्चू दिला यांसह अनेक त्यांनी आरोप केले होते. शरद उपाध्ये यांच्या टीकेवर निलेशने व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तरही दिलं होतं.(household art) त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी निलेश साबळेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आपली मत मांडताना दिसत आहेत. त्यानंतर आता ‘बॉस माझी लाडाची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आयुष संजीवने इन्स्टाग्रामवर निलेशच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे.
आयुष संजीवने इन्स्टाग्रामवर ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील निलेश साबळे सोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत अभिनेत्याने लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आयुषने लिहिलेय की, “ “चला हवा येऊ द्या” हा कार्यक्रम माझ्यासाठी फक्त एक मंच नव्हता, तर झी मराठीने दिलेलं एक सुंदर गिफ्ट होतं. माझा पहिला व्हायरल व्हिडिओ इथूनच आला होता आणि अजूनही बरीच लोकं मला त्या व्हिडिओमुळेच ओळखतात. इथली संपूर्ण टीम ,कलाकार, दिग्दर्शक, प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट ,सगळेच अतिशय प्रेमळ, व्यावसायिक आणि कलाकारांना समजून घेणारे आहेत. नवोदित कलाकारांनाही इथं मोकळेपणाने व्यक्त होता येतं. डॉक्टर निलेश साबळे सरांनी मला ओळखून, समजून घेतलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कायम त्यांचा आभारी आहे.”
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं