आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान

मराठा आरक्षण (Reservation)लढ्यातील विजयाशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी कठोर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. येत्या २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मराठा कार्यकर्त्यांसह मुंबईतील आझाद मैदानात लढा देणार आहेत.
मराठा आरक्षण लढ्यातील विजय मिळवल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी शपथ जणू मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईला धडक देण्याची तयारी सुरु केली आहे. या आंदोलनात आता माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आता आपण मराठा आरक्षण(Reservation) मिळवूनच स्वस्थ बसणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक देणार असल्याचे म्हटले आहे. आज धाराशिव येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला.

त्यावेळी आता मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यावरच फेटा खालू असे म्हणत त्यांनी फेटा बांधण्यास नकार दिला आहे. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार आहेत.मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिवमध्ये दौरा आणि गाठीभेटी घेणे सुरु आहे. यावेळी त्यांच्या मराठा आरक्षण लढ्याच आपण सक्रीय सहभाग घेणार असल्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं. संपूर्ण महाविकास आघाडी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असेल असेही उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये एका रुग्णालयाची लिफ्ट कोसळल्याच्या अपघातातून मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी लिफ्टमधून खाली उतरत असताना त्यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली. या अपघातात मनोज जरांगे पाटील यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही.

हेही वाचा :

राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी राज्यपाल काळाच्या पडद्याआड!
इशा मालवीया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद
भारतातील ‘या’ ठिकाणी दरवर्षी सापडतात हिरे, अनेकजण रातोरात बनतात मालामाल