टीम इंडियाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ५ जून रोजी त्याच्या(india map) टोपणनावासाठी ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. धोनीने ‘कॅप्टन कूल’ साठी हा अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाते. कारण, तो सामन्यादरम्यान कोणत्याही क्षणी शांत दिसून येत असतो.

त्याच्या शांत स्वभावामुळे आणि तीक्ष्ण मनामुळे, महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल अशा नावाने संबोधण्यात येऊ लागले. आता त्याने या नावालाच एक नवीन ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने त्याच्या व्यवसायासाठी ‘कॅप्टन कूल’ नाव ट्रेडमार्क म्हणून वापरेल आहे.
ट्रेडमार्क नोंदणी पोर्टलनुसार, अर्जाची स्थिती मंजूर केली जाते आणि त्याची जाहिरात करण्यात येते. जी १६ जून रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित झाली होती. यासाठीचा अर्ज १६ जून रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.
धोनीकडून ५ जून रोजी या ट्रेडमार्कसाठी अर्ज करण्यात आला होता.(india map) परंतु, धोनी हा एकमेव खेळाडू नाही ज्याने त्याचे टोपणनाव नोंदणीकृत केले आहे. या यादीत असे अनेक भारतीय संघातील खेळाडू आहेत ज्यांनी यापूर्वी हे ट्रेडमार्क नोंदणीकृत केले आहे.
सचिन तेंडुलकर
या यादीत पहिले नाव आहे भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर. त्याच्या ट्रेडमार्क आणि टोपणनावाची नोंदणी करण्याच्या बाबतीत, भारतीय क्रिकेटमधील पहिले नाव सचिन तेंडुलकरचे घ्यावे लागते. महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडून ‘मास्टर ब्लास्टर’ हे टोपणनाव नोंदवण्यात आले आहे. त्याच्या फलंदाजीमुळे त्याला मास्टर ब्लास्टर हे टोपणनाव देण्यात आले आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, सचिन हा १०० शतके करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
विराट कोहली
भारताचा सद्याच्या घडीचा स्टार फलंदाज(india map) विराट कोहलीला क्रिकेटच्या जगात ‘किंग’ म्हणून संबोधले जाते. पण त्याने त्याचे दुसरे छोटे नाव ‘व्हीके’ नोंदवले आहे. विराट कोहली सध्या जगातील सर्वात मोठा फलंदाज असून त्याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापूर्वी २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याने या फॉरमॅटला देखील अलविदा म्हटले आहे.
रोहित शर्मा
सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि धोनी यांच्यानंतर या यादीममध्ये भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माचे नाव देखील समाविष्ट आहे. रोहित शर्माला ‘हिटमॅन’ म्हणून ओळखले जाते. आता त्यानेही ‘हिटमॅन’ हे टोपणनाव ट्रेडमार्क म्हणून नोंदवले आहे. रोहितच्या स्फोटक फलंदाजी आणि आश्चर्यकारक शॉट निवडीमुळे चाहते त्याला हिटमॅन म्हणत असतात. विराट कोहलीप्रमाणेच रोहित शर्माने देखील टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..