आता संपूर्ण देशात डॉली चायवाल्याच्या ब्रँडची जादू,नवा बिझनस प्लान काय ?

डॉली चायवाला आज कोण नाही ओळखत ? त्याच्या चहा( brand ambassadr) बनविण्याच्या अफलातून स्टाईलने नागपूरचा हा चहावाला जगभर प्रसिद्ध झाला आहे. मायक्रोसॉफ्टचे अब्जाधीश बिल गेट्स यांनी डॉली चायवाल्यासोबत चहा काय पिला आणि डॉलीचायवाला आणखीनच प्रसिद्ध झाला. त्यानंतर महागड्या कार आणि परदेशात डॉली चायवाला फिरताना दिसत आहे. दुबईतील आलीशान लाईफ जगताना डॉली चायवाला दिसत असून त्याच्या सोबत फोटो काढण्यासाठी भलेभले लोक रांगा लावून असतात असे दृश्य आहे. आता डॉली चायवाला त्याच्या बिझनेसचा विस्तार करीत आहे. एका योजनेनुसार आता डॉली चायवाला त्याच्या चहाचा ब्रँड देशभरात लाँच करणार आहे. ज्यात वेगवेगळ्या शहरातील लोक त्याच्याशी जोडले जाणार आहेत. काय आहे त्याचा प्लान वाचूयात…

डॉली चायवाला आता देशभरात आपल्या दुकानांची फ्रेंचायझी उघडणार आहे. ( brand ambassador)त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्टद्वारे आपल्या चहाच्या दुकानांची फ्रेंचायझीद्वारे चहाची दुकाने खोलण्याची घोषणा केली आहे. आपला लोकप्रिय ब्रँडला वाढविण्याच्या योजनेचा खुलासा करताना त्याने पोस्टमध्ये लिहीलेय की , आम्ही संपूर्ण भारतात आपल्या डॉली फ्रेंचायझीद्वारे चहाचे स्टोअर आणि ठेले लाँच करण्यासंदर्भात उत्सुक आहोत.

तसेच त्यांनी म्हटले की हा भारताचा पहिला व्हायरल स्ट्रीट बँड आहे आणि आता हा व्यवसाय करण्याची एक संधी आहे. साध्या दुकानापासून ते कॅफेपर्यंत, आम्ही देशभरात या लाँच करीत आहोत. या स्वप्नाला पुढे वाढविण्यासाठी खऱ्या लोकांच्या शोधात आहोत असेही त्याने म्हटले आहे.त्यांनी म्हटले की, ‘जर तुम्ही काही मोठे, काही देशी, शानदार बनवण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी ही वेळ आहे. मर्यादित शहर,अमार्यदित चहा. अर्ज मागवणे सुरु केले आहे.’ ज्या व्यक्तीला त्यांचा ब्रँडची फ्रेंचायझी खोलायची असेल तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रोफाईलमध्ये दिलेल्या एका क्लिक करु शकता आणि तेथे जाऊन फ्रेंचायझी संबंधित माहीती घेऊ शकता ?

डॉली चायवालाच्या वतीने फ्रेंचायझीची घोषणा केल्यानंतर(brand ambassador) आता सोशल मीडियावर डॉली चायवाला याची चर्चा होत आहे. या पोस्ट विविध कमेंट्स येत आहेत. काही लोकांनी या प्राऊंड मोमेंन्ट म्हटले आहे. तर काही लोकांनी भारतात एज्युकेशन एक घोटाळ्यासारखे आहे असे म्हटले आहे. एका युजरने म्हटले की मला हे सहन होत नाही.सोशल मीडियावर विरोधात आणि बाजूंनी टीका टीपण्णी होत आहे.

हेही वाचा :

फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर?

‘या’ लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती

क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL