पुण्यातील रस्त्यावर धावत्या बाईकवर रोमान्स करतानाचा कप्लसचा एक व्हिडिओ समोर आला आहे.(petrol)आजूबाजूचे भान हरपून हे कपल्स रोमान्समध्ये बुडाल्याचे दिसतेय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणेकरांकडून याबाबत संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. आता पुण्यात एवढंच बाकी होतं, असा राग अन् संताप व्यक्त करण्यात येत आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संताप व्यक्त होत आहे. याला अश्लील चाळे म्हणायचं का अती प्रेम! पुण्यातील एका प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर असल्याचं बोललं जातं आहे. एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँक वर उलटी बसली आहे आणि विशेष म्हणजे दुचाकीस्वार ही दुचाकी चालवतोय.

आजू बाजूच्या लोकांनी अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईल मध्ये काढले पण आजूबाजूचे भान विसरून हे जोडपं त्यांच्या प्रेमात अखंड बुडालं होतं. (petrol)कारण ना त्यांच्या वागणुकीत सुधार केला की ना त्यांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे काही जणं तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे.

या व्हिडिओत एक तरुणी दुचाकीच्या पेट्रोल टँकवर उलटी बसलेली दिसत आहे, तर तिचा साथीदार दुचाकी चालवत आहे. आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला, पण या जोडप्याने कोणतीही पर्वा न करता आपल्या वागणुकीत बदल केला नाही. व्हिडिओत दिसणारे दृश्य अनेकांना धक्कादायक वाटले. या जोडप्याच्या बेफिकीर वर्तनामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली.(petrol) सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.पुणे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, व्हिडिओच्या आधारे या जोडप्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. पुण्यात हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
खुशखबर! सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा घसरण!
लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा
लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ; 26.34 लाख अपात्र लाभार्थी, जुलैचे पैसे मिळणार का?