भयंकर अपघात! रस्त्यावरून जाताना तरुणीला कारने चिरडलं, हृदय पिळवटणारा VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.(media) या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याने शांतपणे चालत असते आणि काही क्षणांतच एक भरधाव कार तिला इतक्या वेगात धडकते की ती थेट रस्त्यावरच चिरडली जाते. अपघात इतका भीषण होता की तिचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत, तर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, संबंधित तरुणी पादचारी मार्गाने जात होती. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला जोरदार धडक दिली.(media) धडक दिल्यानंतर तरुणी कार खाली चिरडली जाते. काही क्षणात घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमते.

अपघाताच्या क्षणाचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.(media) काहीजणांनी तो व्हिडिओ शेअर करत ड्रायव्हिंग करताना भान ठेवण्याचं आवाहन केलं आहे, तर काहींनी कारचालकाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ एक्सवरील अर्थात ट्वीटर या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. “रस्त्याने चालणंही धोकादायक झालंय का?” असा सवाल अनेकजण विचारत आहेत. काहींनी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..