मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता महिलांचं लक्ष सप्टेंबरच्या १५०० रुपयांच्या हप्त्याकडे लागलं आहे.

कारण नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. (women) त्यामुळे आता सप्टेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून विचारला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा सन्मान निधी ऑक्टोबरमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. २५ ऑक्टोबरनंतर हा पैसा महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, ही तारीख सध्या ठरलेली नाही. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच हप्ता नेमका कोणत्या दिवशी जमा होणार, हे स्पष्ट होईल. (women) त्यामुळे लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी फिरणाऱ्या अपुऱ्या माहितीकडे लक्ष न देता अधिकृत अपडेटची वाट पाहणं महत्त्वाचं आहे.पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली होती. २ ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात ऑगस्टची रक्कम जमा झाल्याचं सांगण्यात आलं. आता सप्टेंबरचा हप्ता कधी येतो, याची महिला वाट पाहतायेत.
राज्यातल्या १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याचं सांगितलं जातं. पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात DBT म्हणजेच थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. यंदा ऑक्टोबरमध्ये नवरात्र आणि दसरा हे सण आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता देण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबरनंतर हप्ता जमा होऊ शकतो, अशी माहिती सध्या समोर येत आहे. मात्र, अंतिम निर्णय आणि तारीख सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. (women) त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपलं बँक खातं, DBT स्थिती आणि योजनेतली पात्रता तपासून ठेवावी. सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होतोय, याकडे आता सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय