जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या OpenAI चा चॅटबोट(chatbot) ChatGPT अमेरिकेत पुन्हा एकदा डाऊन झाला आहे. अलीकडेच युजर्सनी ChatGPT बाबत तक्रार केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा युजर्सना ChatGPT चा वापर करण्यात समस्या आली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा ChatGPT डाऊन झाला आहे. याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

वेबसाइट आणि डिजिटल सेवांच्या आऊटेजबाबच माहिती देणारी वेबसाईट DownDetector सांगितलं आहे की, आतापर्यंत 3,400 हून अधिक युजर्सनी ChatGPT डाऊन झाल्याची तक्रार केली आहे. सध्या ChatGPT डाऊन झाल्याची तक्रार केवळ अमेरिकेतील युजर्सकडून नोंदवण्यात आली आहे.
डाउन डिटेक्टर यूजर्सचे म्हणणे आहे की ते ChatGPT वर त्यांची चॅट हिस्ट्री उघडू शकत नाहीत. त्यांना एक असामान्य एरर मेसेज दिसत आहे. आतापर्यंत 82% यूजर्सनी डाउन डिटेक्टरवर आउटेजची तक्रार केली आहे. यासोबतच, 12% यूजर्सनी वेबसाइटमध्ये समस्या येत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, 6 टक्के यूजर्सना अॅपमध्ये समस्या येत आहेत. ChatGPT ची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी युजर्सकडून केली जात आहे.

OpenAI ने जगातील पहिला AI चॅटबोट(chatbot) ChatGPT 2022 मध्ये लाँच केला होता. अगदी कमी कालावधीत ChatGPT ने प्रंचड लोकप्रियत मिळवली. एखाद्या विषयावरील माहिती शोधणं असो किंवा गणितं सोडवणं असो, ChatGPT तुम्हाला तुमच्या अनेक कामांत मदत करतो. एवढचं नाही तर ChatGPT एखाद्या मित्राप्रमाणे तुमच्यासोबत गप्पा देखील मारू शकतो. लाँच झाल्यापासून आतापर्यंच ChatGPT मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कंपनीने ChatGPT मध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. त्यामुळे युजर्सचा अनुभव सध्या पूर्वीपेक्षा अधिक चांगला झाला आहे.
असे अनेक युजर्स आहेत जे त्यांच्या विविध कामांसाठी ChatGPT ची मदत घेतात. अशातच ChatGPT अचानक डाऊन झाल्याने युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ChatGPT डाऊन झाल्यास युजर्सची अनेक कामं अडतात. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स आहेत. मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांचे स्वत:चे AI चॅटबोट लाँच केले आहेत. जसं की गुगलचे जेमिनी, एलन मस्कचे ग्रोक, इत्यादी. त्यामुळे ChatGPT डाऊन झाल्यास तुम्ही या चॅटबोटची देखील मदत घेऊ शकता.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गुडन्यूज! राज्यात आता कृषी समृद्धी योजना सुरू
आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात माठी घसरण, चांदीचे भाव स्थिर!
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट आणि मऊ पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी