बीडमधून संतापजनक (Infuriating)प्रकार समोर आला आहे. एका शाळकरी मुलीला पाईपने मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीडमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शाळकरी मुलीला पाईपने मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे (Infuriating).एक अल्पवयीन शाळकरी मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेत जात असतांना तीन मुलांनी शाळकरी मुलीला बळजबरीने उचलून वाहनात बसवले. काही अंतरावर नेत तिचा विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

यातील दोघांनी पीडित मुलीला पाईपने मारहाण केली. अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरुधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक अधिक तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम बोरखेडे, मधुकर केमक आणि एक अनोळखी मुलांविरुद्ध दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुलढाणा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
तुम्हीही स्मार्टफोनचा अतिवापर करता का? जाणून घ्या ‘हे’ गंभीर परिणाम आणि उपाय!
“इंजेक्शन घेतलंस का रे तू?” शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातील संवाद स्टंप माइकमध्ये कैद
या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर