कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, व्यक्ती कोणीही असो तिचे गय केली जाणार नाही. अशा शब्दात सर्वसामान्य जनतेला आश्वासित करणारे पालकमंत्री अजित दादा पवार, भयमुक्त वातावरणाची ग्वाही देणारे पोलीस अधीक्षक नवनीत कावत पण तरीही बीड जिल्ह्यात गुंड मोकाट असल्याचे चित्र वारंवार समोर येते आहे. बुधवारी पोलीस स्थानकासमोर न्याय मिळत नाही म्हणून एका अभागी महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीचे वस्त्रहरण आहे. न्यायासाठी(justice) जीव पणा ला लावण्याची कुणावर वेळ येत असेल तर गतिशील सरकारचे ते ठसठशीत अपयश आहे असेच म्हणावे लागेल.

मस्साजोग गावचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्याचे भयानक अंतरंग महाराष्ट्राच्या समोर आले. राजकीय आश्रयाच्या मदतीने गुंडांच्या फौजा कशा तयार होतात, क्रूर सैतानालाही एका कोपऱ्यात जाऊन बसायला लावणारे रक्तपिपासू पैदास कसे होतात, याचे भेसळ चित्र साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले.
संपूर्ण जिल्हा प्रशासनाची सूत्रे मानवी रूपातील नरभक्षक श्वापदांच्या हातात असल्याचे उघडे नागडे सत्य बाहेर आल्यानंतर राज्य शासनाला जाग येते आणि मग वाल्मीक कराड आणि त्याची पिलावळ गजाआड केली जाते. नंतर तुरुंग प्रशासनातील भ्रष्ट व्यवहार पुढे येत राहतात. शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्याच्या फायलींचा प्रवास जलद गतीने होत असल्याचे प्रकार घडतात. बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर ला जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर काही दिवसातच प्यारांवर सोडण्याची त्याची फाईल सहीच्या प्रतीक्षेत असते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आधी काही महिने मनोहर मुंडे या व्यक्तीची हत्या परळी येथे होते. पण त्यातील गुन्हेगार सापडत नसल्याचे वास्तव देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर पुढे येते. सत्तारूढ पक्षाचे एक आमदार सुरेश धस तसेच खासदार बजरंग सोनवणे हे लोकप्रतिनिधी महादेव मुंडे हत्या प्रकरण लावून धरतात.
खुनातील आरोपी सापडत का नाहीत असा सवाल उपस्थित करतात. पण तरीही पोलीस प्रशासनाकडून काहीही घडत नाही. जणू काही “आरोपींना हात लावाल तर खबरदार” अशी अप्रत्यक्ष धमकीच त्यांना मिळाली आहे. महादेव मुंडे नावाची एक व्यक्ती अचानक गायब होते. आणि नंतर मृतदेहच सापडतो. एक नांदते घर उध्वस्त होते. ही हत्या कोणी केली आणि का केली हे आजतागायत स्पष्ट होत नाही.

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी या असहाय्य आणि हतबल होतात. आपल्या पतीचे मारेकरी स्थानिक पोलीस शोधून काढतील या विश्वासावर त्या काही दिवस राहतात. पोलिसांकडून काही हालचाली होत आहेत असे दिसत नाही. मग त्या अस्वस्थ होतात. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अस्तित्वात आहे काय याबद्दलच शंका यावे असे एकूण वातावरण.
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय(justice) मिळवून देण्यासाठी पुढे येतात.
महादेव मुंडे यांचे मारेकरी कोण आहेत याचे पोलीस प्रशासनाला इंडिकेशन देतात. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या एका टोळीतील काही सदस्य महादेव मुंडे यांचे मारेकरी आहेत याचे स्पष्ट निर्देश त्यांच्याकडून दिले जातात पण तरीही कुणालाही अटक होत नाही. याचाच अर्थ असा की पोलिसांवर कुठल्यातरी
“आका” चे दडपण आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरण पोलीस अधीक्षक नवनीतकावत हे गांभीर्याने घेतात. या प्रकरणाचा कसून तपास केला जाईल याची ग्वाही देतात. पण त्यालाही काही महिने उलटूनही आरोपी सापडत नाहीत.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस स्थानकाच्या बाहेर पोलीस प्रशासनाचा निषेध करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोबत आणलेल्या बाटलीतील त्यांनी विष प्राशन केल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. मग मात्र पोलीस प्रशासनाची घाबरगुंडी उडाली. तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले(justice). आपल्या पतीचे मारेकरी कोण आहेत हे पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत आहे. त्यातील काही जण वेगळ्या गुन्ह्याखाली तुरुंगात आहेत. पण तरीही त्यांना महादेव मुंडे यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली जात नाही हे दुर्दैव आहे.
आमदार सुरेश धस यांनी मारेकरी कोण आहेत हे माहीत असूनही पोलीस त्यांना हात लावू शकत नाहीत. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तर खासदार बजरंग सोनवणे यांनीही महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून संशयित आरोपींना वाचवले जात असल्याचे म्हटले आहे. आरोपींना अटक करा ही ज्ञानेश्वरी मुंडे यांची गेल्या अनेक महिन्यापासून ची मागणी आहे. पण तरीही त्यांना न्याय मिळत नसेल आणि त्यातून नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न करावा लागत असेल तर पोलीस प्रशासनाचे हे मोठे अपयश आहे असे खासदार सोनवणे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. अजितदादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. या दोघांचेही बीड जिल्ह्या कडे लक्ष आहे. पण तरीही महादेव मुंडे यांचे मारेकरी आज त्यांची हत्या होऊन 18 महिने झाले तरी सापडत नाहीत हे वास्तव गतिशील सरकार बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
हेही वाचा :
गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी
‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका
कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली