पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह(political campaign) यांच्यासोबत बैठक झाली होती, भाजपसोबत जाण्याची निर्णय आम्ही घेतला होता. ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेच्या शपथविधी झाला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्याला शरद पवारांनी उत्तर दिले आहे. “भाजपसोबत जाण्याचा आमची इच्छा नव्हती, आणि कधीही नसणार,” असे पवारांनी सांगितले .
2019 च्या निवडणूक निकालानंतर राज्यात(political campaign) सत्तास्थापन होण्यापूर्वी आमची (राष्ट्रवादी काँग्रेस) एका बड्या उद्योपतींच्या घरी अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. मंत्रीमंडळातील खातेवाटपाबाबतही निर्णय झाला होता. प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत होते. पण शरद पवार मुंबईत आल्यानंतर त्यांना शब्द फिरवला, मी शब्द पाळणारा आहे. मला अमित शाह यांचा फोन आला, त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता.
दहा वर्ष शरद पवारांनी काय केले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी शहांवर सुनावले. दहा वर्ष सत्तेत ते होते, आम्ही नाही. त्यांनी सत्तेत असतांना दहा वर्ष काय केले असा सवाल शरद पवारांनी केला. “2014 ते 2024 पर्यंत सत्तेत होते. ते मला जाब विचारतात. मग दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही काय केलं हे सांगायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही काय केलं हे जगाला माहिती आहे,” असा टोला पवारांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक, चंद्रपूरसह देशभरातील 21 राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील 102 लोकसभा मतदारसंघात काल, शुक्रवारी मतदान झाले. याच्या कमी झालेल्या टक्केवारीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
हेही वाचा :
दोन महिन्यात सोनं 11 हजारांनी महागले!
वर्षा गायकवाड दलित असल्याने उमेदवारी नाकारली, मिलिंद देवरा आरोप
वीकेंडला सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत व्हेज फ्रॅकी