चालू क्लासमध्ये ‘फिजिकल प्रॅक्टिकल’! विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला फ्री किसिंग शो

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे, जो देशातील लाखो विद्यार्थ्यांना(Students) ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या Physics Wallah या लोकप्रिय एज्युकेशन प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे. JEE, NEET आणि CBSE परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या या संस्थेचे क्लासेस नेहमीच गुणवत्तेसाठी ओळखले जातात. मात्र, अशा प्रतिष्ठित संस्थेशी संबंधित असलेला एक व्हिडिओ समोर आल्याने शिक्षणविश्वात खळबळ उडाली आहे.

हा व्हिडिओ Physics Wallah च्या एका ऑनलाईन क्लास दरम्यानचा आहे, ज्यामध्ये सुरुवातीला एक महिला शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसते. काही वेळातच एक पुरुष शिक्षक देखील स्क्रीनवर येतो आणि आपली ओळख करून देतो. सुरुवातीला हा क्लास पूर्णपणे शैक्षणिक आणि शिस्तबद्ध वाटतो. मात्र अचानक दृश्य बदलते आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर(Students) ऑनलाईन क्लासदरम्यान दोघे शिक्षक एकमेकांना किस करताना दिसतात. हे दृश्य पाहून अनेक पालक आणि विद्यार्थी स्तब्ध झाले आहेत.

ही घटना ऑनलाईन शिक्षणाच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे. शिक्षक हा समाजात एक आदर्श म्हणून मानला जातो. त्याचं वर्तन आणि शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांवर खोल परिणाम करत असते. अशा घटनांमुळे शिक्षकांबद्दलचा आदर कमी होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांमध्ये चुकीचे संकेत जातात आणि त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. या घटनेमुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि नैतिकतेबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे भविष्यातील एक महत्वाचं माध्यम आहे, पण त्यात शिस्त, जबाबदारी आणि व्यावसायिक वर्तन अत्यंत आवश्यक आहे.

Physics Wallah संस्थेने या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही, परंतु सोशल मीडियावर युजर्स शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा प्रकारच्या वागणुकीला शिक्षणाच्या नावावर माफी मिळू शकत नाही. संबंधित शिक्षकांवर कडक कारवाई करून इतर शिक्षकांसमोर उदाहरण ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. शिक्षकांनी आपली भूमिका आणि जबाबदारी समजून घेतली पाहिजे, कारण त्यांचं प्रत्येक वर्तन विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचं माध्यम असतं. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे शिक्षण संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन असो वा ऑफलाईन, शिक्षकांनी शिस्तीचे आणि नैतिकतेचे भान राखणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे