पंजाबमधील लुधियानामध्ये आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने(political leader) स्वतःच्या पत्नीची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी अनोख मित्तल याचे एका 24 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची माहिती पत्नी लिप्सी मित्तल हिला मिळाल्याने, आरोपीने तिचा काटा काढण्याचा कट रचला.

शनिवारी अनोख आणि लिप्सी मित्तल हे लुधियानाच्या मालेरकोटला येथे एका हॉटेलात जेवायला गेले होते. जेवणानंतर दोघे घरी परतत असताना चार हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
धारदार शस्त्रांनी वार करून हल्लेखोरांनी लिप्सी मित्तल(political leader) यांचा निर्घृण खून केला. घटनेनंतर अनोख मित्तलने आपल्यावरही हल्ला झाल्याचा बनाव रचत पत्नीच्या हत्येची जबाबदारी हल्लेखोरांवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सखोल तपास करून सत्य समोर आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोख मित्तलने यापूर्वी दोन वेळा पत्नीला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात अपयश आल्याने त्याने चौघांना सुपारी दिली. हत्येसाठी त्याने हल्लेखोरांना आधी 50 हजार रुपये दिले आणि नंतर 2 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी आरोपीचा हा कट उघड करत अनोख मित्तलसह त्याच्या 24 वर्षीय प्रेयसीला अटक केली आहे.
लुधियानाचे पोलीस आयुक्त कुलदीप सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोख मित्तल आणि त्याच्या प्रेयसीसह हल्लेखोर अमृतपाल सिंह उर्फ बल्ली, गुरदीप सिंह उर्फ मन्नी, सोनू सिंग आणि सागरदीप सिंग उर्फ तेजी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
नागरिकांनो काळजी घ्या उन्हाचा तडाखा, आणखी वाढणार तापमान
महा रॅली काढावी लागते हे लोकप्रतिनिधींच अपयश
शरद पवार आणि अजित पवार कधीही एकत्र येतील; बड्या नेत्याच्या दाव्यामुळे एकच खळबळ